किंग खान शाहरुखच्या पठाण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

किंग खान शाहरुखच्या पठाण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : आज 10 जानेवारीला किंग खान शाहरुखच्या पठाण या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. तर आता पठाण चित्रपटाच्या ट्रेलरमधील डायलॉग आणि सीन्स पाहुन चाहत्यांनी यावर कमेंटचा वर्षाव केला आहे.

अभिनेता शाहरूख खान, दिपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम या चित्रपटामध्ये मुख्यभूमिकेत आहेत. तर येत्या 25 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जेव्हापासून या चित्रपटाचा टिझर आणि पहिले गाणे गाणे रिलीज झाले तेव्हापासून या चित्रपटावरुन बराच गदारोळ सुरू झाला होता.

‘पठाण’ थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी जेमतेम दोन महिने उरले आहेत, अशा परिस्थितीत शाहरुख खानही त्याच्या आगामी अ‍ॅक्शन चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्याच्या तयारीत आहे. ‘पठाण’ सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेला अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. त्याचा स्क्रीनप्ले श्रीधर राघवन लिहिला आहे.

2022 वर्षात, शाहरुख खानने बॉलिवूडच्या ‘ब्रह्मास्त्र’, ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ आणि ‘लाल सिंह चड्ढा’ मध्ये कॅमिओ भुमिका केल्या होत्या. तर 2023 मध्ये शाहरुख खानचे चाहते त्याला मुख्य भुमिकेत पाहू शकणार आहेत. 2023 मद्ये तो एक नाही तर तीन-तीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्यामध्ये ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ रिलीज होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube