राजकुमार राव च्या “स्त्री 2’ मधील पॉवरपॅक परफॉर्मन्स साठी राम गोपाल वर्मा यांच्याकडून कौतुकाच. थाप

राजकुमार राव च्या “स्त्री 2’ मधील पॉवरपॅक परफॉर्मन्स साठी राम गोपाल वर्मा यांच्याकडून कौतुकाच. थाप

Actor Rajkummar Rao : राजकुमार राव स्टारर ‘स्त्री 2’ चित्रपटगृहात दाखल झाला आहे आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हॉरर-कॉमेडीच्या यशात झोकून देणाऱ्या या अभिनेत्याचे चित्रपटातील अस्सल  ( Rajkummar Rao)अभिनयासाठी सर्वात अष्टपैलू कलाकार म्हणून त्याची ओळख संपादन केली आहे.

सान्या मल्होत्राची ​​बॉलीवूडमध्ये आहे वेगळी ओळख: सर्वाधिक मागणी असलेल्या अभिनेत्रींमध्ये आहे समावेश

प्रेक्षकांव्यतिरिक्त राजकुमार रावच्या अभिनयाने अलीकडेच प्रसिद्ध चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांचं लक्ष वेधून घेतलं ज्यांनी त्याच्या सोशल मीडियावर पॉवर-पॅक कलाकाराचे कौतुक केले आहे. सर्व मोठे तारे जेव्हा आरशात पाहतात तेव्हा त्यांना राज कुमार राव यांचा चेहरा दिसतो अशी पोस्ट लिहीत त्यांनी राजकुमारच कौतुक केलं.

राजकुमार रावने ‘श्रीकांत’ आणि ‘मिस्टर आणि मिसेस माही’ सोबत बॅक टू बॅक हिट्स देऊन 2024 ची जोरदार सुरुवात केली. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री 2’ च्या महत्त्वपूर्ण यशानंतर राजकुमार रावने नक्कीच ब्लॉकबस्टर्सची हॅट्रिक मारली आहे. अमर कौशिक दिग्दर्शित हॉरर कॉमेडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 54.35 कोटींच्या कमाई नंतर 2024 मधील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.

‘स्त्री 2’ चित्रपटगृहांमध्ये यशस्वीपणे चालत असताना राजकुमार राव त्याच्या पुढच्या थिएटर रिलीजसाठी तयारी करत आहे. ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’मध्ये अभिनेता तृप्ती दिमरीसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय, अभिनेत्याकडे आणखी काही आगामी प्रकल्प आहेत ज्यांची घोषणा या वर्षाच्या अखेरीस करणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या