Nitin Desai Death : सुप्रिसद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई अनंतात विलीन; एन.डी. स्टुडिओत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nitin Desai Death : सुप्रिसद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी कर्जत येथील एन.डी. स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार त्यांच्यावर त्यांच्या एन. डी स्टुडिओमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधिला विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. तर त्यापूर्वी त्यांच्या पार्थिव अंत्यदर्शन करण्यासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी अनेक दिग्गजांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्य दर्शन घेतल्याचं पाहायाला मिळालं. ( Last Rituals on art director Nitin Desai after Death in N D Studio )
ज्ञानवापी सर्वेक्षणाला सुप्रीम कोर्टाचा ग्रीन सिग्नल, मुस्लिम पक्षाला मोठा धक्का
यावेळी राजकीय, कला, चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यावरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल. त्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, किरीट सोमय्या, मधुर भांडारकर, रवी जाधव. यांच्या अनेक मान्यावरांनी देसाईंचं अंत्यदर्शन घेत प्रतिक्रिया दिल्या. तर मधुर भांडारकर, सुबोध भावे, मानसी नाईक, सोनाली कुलकर्णी, आशुतोष गोवारीकर, आमिर खान, अभिजित केळकर, नंदेश उमप, रवी जाधव या कलाकारांनी नितीन देसाई यांच्या अंत्यदर्शनाला हजेरी लावली.
‘गांधी कभी माफी नहीं मांगते, SC चा निकाल द्वेषाविरोधातील मोठी चपराक’; वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
नितीन देसाई यांच्या कार्याची व्याप्ती प्रचंड आहे. मुंबईतील कर्जत जवळ त्यांनी एक भव्य स्टुडीओ उभा केला होता. ज्याद्वारे अनेक सिनेमांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यांच्या कलेच्या जोरावर त्यांनी संपूर्ण देशात नाव कमावले. खास करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांसाठी त्यांनी अनेक वेळा सेट उभारले आहेत.
आर्थिक विवंचनेतून आत्महत्या :
दरम्यान, उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ४ वाजता कला कलादिग्दर्शक यांनी आत्महत्या केली. ते आर्थिक अडचणीत होते अशी माहिती मिळत आहे. ‘स्टुडिओ हा फ्लिमवर चालतो. मात्र, स्टुडिओ चालत नसल्यामुळे ही घटना घडली आहे. गेल्या 2 महिन्यांपूर्वी त्यांच्याशी बातचीत झाली होती. तेव्हा देखील त्यांनी आर्थिक विवंचना सुरू आहे असं सांगितलं होतं.