Letsupp Exclusive : ‘त्यादिवशी’ देवाच्या पाया पडून टेन्शनमध्ये निघालो होतो : भरत जाधव असं का म्हणाले?

Letsupp Exclusive : ‘त्यादिवशी’ देवाच्या पाया पडून टेन्शनमध्ये निघालो होतो : भरत जाधव असं का म्हणाले?

प्रेरणा जंगम

Bharat Jadhav: ‘सही रे सही’ हे नाटक (Sahi Re Sahi Drama) मराठी रंगभूमीवरील लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेलं नाटक आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित हे नाटक इतकी वर्षे नाट्यरसीकांच्या ह्दयावर राज्य करतय. भरत जाधव (Bharat Jadhav) यांचं अभिनयकौशल्य, उत्तम कॉमेडी टायमिंग आणि वेग या सगळ्याच गोष्टी या नाटकाच्या बाबतीत उत्तम जुळून आल्यात. 15 ऑगस्ट 2002 मध्ये सुरु झालेल्या या नाटकाला आजही नाट्यगृहात हाऊसफुलच्या पाट्या लागतात.

केदार शिंदे दिग्दर्शित ‘तू तू मी मी’ या नव्या नाटकातही भरत जाधव मुख्य भूमिका साकारत आहेत. याच निमित्ताने लेट्सअप मराठीने (Letsupp Marathi) भरत जाधव यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केलीय. यावेळी त्यांनी सही रे सही नाटकाच्या आठवणींना उजाळा दिलाय. या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची आठवणही त्यांनी सांगितली.

भरत जाधव सांगतात की, “आम्ही तेव्हा पुण्यात पिंपरीला तालमी केल्या होत्या. त्यातील एक तालीम आमच्या निर्मात्यांनी पाहिली आणि ते म्हटले नीट बसलं नाही, अजून तारीख पुढे ढकलण्यात आली. 15 ऑगस्ट 2002 हे नाटक येणार होतं तेव्हा. मुख्य तालीम करुन आम्ही खूप दमलो होतो. केदार मग निर्मात्यांना म्हटला की अजून एक तालीम सकाळची बघा आणि त्यावरून निर्णय घ्या. मग सकाळची जी तालीम केली ती त्यांना आवडली. तिथून आल्यानंतर ज्या दिवशी प्रयोग होता तेव्हा सकाळी देवाच्या पाया पडून मी टेन्शनमध्ये निघत होतो. तर माझी बायको म्हणाली की एवढे दिवस तालमी केल्या आता कशाला घाबरताय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

तर मी तिला म्हंटल की या नाटकात अस की एखादी एन्ट्री जरी चुकीची निघाली किंवा चुकीच्या कॅरेक्टरने एन्ट्री घेतली तर आमची संपूर्ण टीम हलेल. ते कुठे होऊ नये याची भिती होती. पण नशीबाने एडवान्समध्ये हाऊसफुलचा बोर्ड लागला होता. तिथून ते हाऊसफुलचा बोर्ड इतकी वर्षे टिकून राहिलाय. निर्माते बदलले सगळं बदललं पण लोकांनी त्या कलाकृतीवर प्रेम केलय. आजही ती कलाकृती पाहायला लोकं येतात. या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला भरत जाधव यांना नाटकात काही चुकीचं होऊ नये याची भिती वाटली होती. शिवाय या नाटकाने त्यांच्या आयुष्याला कशी कलाटणी दिली हे देखील ते सांगतात.

Kon Honaar Crorepati: ‘कोण होणार करोडपती’च्या विशेष भागात उलगडणार बाप-लेकीचे अनोखे नाते

“सही रे सही या नाटकाने खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली. सही रे सही आल्यानंतर मला चित्रपटांची ऑफर्स आल्या. पण मी एकवेळ चित्रपट थांबवलं पण नाटक थांबवलं नाही. आज या नाटकाला 22, 23 वर्षे झालीत. आता 4444 प्रयोग मोठ्या पद्धतिने करेल आणि त्यासाठी काहीतरी वेगळा प्लॅन करेल. हे नाटक असय की खूप रिपीट प्रेक्षक आहेत. इतकं की आमचे डायलॉग पण खालून प्रेक्षक म्हणतात.

हे फक्त आता नाटक राहिलेलं नाही तर एक उत्सव झालय. एखाद्या उत्सवात किंवा जत्रेत सामील होतो तशी प्रेक्षकांची या नाटकाच्या बाबतीत मनस्थिती असते. उत्फुर्त प्रतिसाद हा नकळत आपल्याला तरुण करतो. या नाटकाचा वेग हा प्लस पॉईंट आहे. ज्या दिवशी तो स्पीड ढासळेल तेव्हा नाटक नक्कीच बंद करेल. पण जोपर्यंत मला आत्मविश्वास आहे की मी त्या स्पीडला न्याय देतोय तोपर्यंत हे नाटक करत राहायचं.”

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube