Made In Heaven 2 trailer: इमोशन्स, ड्रामा अन् सर्वकाही; ‘मेड इन हेवन 2’ नक्की कशी आहे? पाहा ट्रेलर

Made In Heaven 2 trailer: इमोशन्स, ड्रामा अन् सर्वकाही; ‘मेड इन हेवन 2’ नक्की कशी आहे? पाहा ट्रेलर

Made In Heaven 2 trailer: मेड इन हेवन (Made In Heaven) या सीरिजला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली. ‘मेड इन हेवन’ ही सीरिज २०१९ मध्ये प्रदर्शित झाली होती. आता या ड्रामा सीरिजचा (Drama series) दुसरा सीझन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकताच ‘मेड इन हेवन-2’ (Made In Heaven 2) या ड्रामा सीरिजचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरने अनेकांचे चांगलेच लक्ष वेधल्याचे पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)


अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि अभिनेता अर्जुन माथूर या दोघांच्या ‘मेड इन हेवन’ या ही मल्टीस्टारर वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. ३ मिनिटे २३ सेकंदांच्या या ड्रामेबाज ट्रेलरमध्ये अनेक कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे. मेड इन हेवन-2 ही वेब सीरिज वेडिंग प्लॅनर्सवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. तसेच असा हटके ट्रेलर पाहून समजते की, वेडिंग प्लॅन करत असताना येणाऱ्या अडचणी, तसेच ज्याचं लग्न होणार आहे, त्या जोडप्यांमध्ये असणारे मतभेद या सर्व गोष्टी ट्रेलरमधून दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मेड इन हेवन-2 या वेब सीरिजचा ट्रेलर बघितल्यावर आता चाहते देखील या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

यामध्ये मृणाल ठाकूर, दिया मिर्झा, राधिका आपटे या हॉट अभिनेत्रींची झलक देखील मेड इन हेवन-2 सीरिजच्या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे. तसेच जोया अख्तर, अलंकृता श्रीवास्तव, नीरज घेवान आणि नित्या मेहरा या ४ दिग्दर्शकांनी या सीरिजचे दिग्दर्शन केल्याचे पाहायला मिळाले आहे. फरहान अख्तरनं ‘मेड इन हेवन 2’ या वेब सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, ‘वेडिंग सीझनला अधिकृतपणे सुरूवात झाली आहे. तुमच्या आवडत्या वेडिंग प्लॅनर्सनं पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.’

Ishq Ka Asar : तुमचे क्षण सुंदर करायला आलंय, स्टॅबिन बेन आणि योगिता बिहानीचं नवं गाणं…

तसेच ही वेब सीरिज १० ऑगस्ट रोजी प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. शोभिता धुलिपाला आणि अर्जुन माथूर यांच्याबरोबर कल्की कोचलिन, जिम सरभ, शशांक अरोरा, मोना सिंह, इश्वाक सिंह, त्रिनेत्रा,शिबानी दांडेकर हे हटके कलाकार देखील ‘मेड इन हेवन 2’ या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारत असल्याचे पाहायला मिळालं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube