महामंडळाचा राजकीय आखाडा करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता; नीलम शिर्के यांची निवडणुकीतून माघार !

Neelam shirke-मी कोणत्याही राजकीय पक्षाची प्रतिनिधी किंवा सक्रीय सदस्य नाही तर मी केवळ आणि केवळ रंगभूमीवर श्रद्धा ठेवणारी महिला कलाकार आहे.

  • Written By: Published:
Neelam Shirke

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची (Marathi Chitrapat Mahamandal) निवडणूक तब्बल दहा वर्षानंतर होत आहे. ही निवडणुकीत जोरदार हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी एका मंत्र्यांच्या ओएसडीवर गंभीर आरोप केला होता. एका मंत्र्यांचा ओएसडी हा कोल्हापूरमध्ये ठाण मांडून आहे. कोणाचे अर्ज भरायचे, नाही भरायचे तो ठरवत आहे. महामंडळात राजकारणाचा शिरकाव झाल्याचा आरोप पाटकर यांनी केला होता. त्यानंतर एक मोठी घडामोड घडली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांची पत्नी नीलम शिर्के (Neelam Shirke) यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहेत. तसे पत्रच त्यांनी काढले आहेत.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही संस्था मराठी चित्रपट आणि त्यासाठी पडद्यावर आणि पडद्यामागे कार्यरत असणाऱ्या सर्व घटकांच्या हितवृद्धीसाठी मागील साठ वर्षांपासून कार्यरत आहे. मी स्वतः मराठी नाटके, चित्रपट, मालिका या माध्यमातून गेल्या 25 वर्षांपासून रंगभूमीची सेवा करीत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बालरंग भूमी परिषद या संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील सर्व घटकांच्या हितवृद्धीच्या दृष्टीने मी प्रामाणिक प्रयत्न करती आहे. याच प्रयत्नाचा भाग म्हणून चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून या क्षेत्रातील कलाकार, कामगारांसहित इतर सर्व घटकांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या या संस्थेसाठी आपण योगदान द्यावे, असा विचार मनात होता. नुकतीच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या प्रक्रियेत प्रमुख भूमिकेत सहभागी असणारे चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि अभिनेते आनंद काळे यांनी दोघांनीही मी या निवडणुकीत उभे राहण्याबाबत आग्रही विनंती केली होती.

भारतीय हवामान विभागाची महत्वाची माहिती; देशात मान्सून कधी दाखल होणार?

त्यांचा मान राखून या निवडणुकीत सहभागी होण्याचे मी ठरविले होते. त्या अनुषंगाने लोकशाही प्रक्रियेचा भाग म्हणून मी स्वतः अभिनेत्री या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. दरम्यान चित्रपट महामंडळाच्या विद्यमान कार्यकारी मंडळाच्या सदस्य असलेल्या वर्षाताई उसगावकर या वर्षीच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नसल्याचे मला स्वत:त मेघराज राजेभोसले यांनीच कळविले होते. परंतु अभिनेत्रीप्रवर्गातून वर्षाताईंनी अर्ज दाखल केल्याचे मला माझा उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता कळाले. मुळात वर्षाताई यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या विरोधात निवडणूक लढवून चित्रपट महामंडळाचा राजकीय आखाडा करण्याचा माझा कोणताही हेतू नाही. निवडणूक कार्यक्रमातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्यापासून सुरू होत आहे, असे असताना प्रसारमाध्यमे आणि समाज माध्यमांतून काही मंडळींनी आरोप-प्रत्यारोप आणि इतरांवर चिखल फेक करायला सुरुवात केली आहे. ही बाब मनाला खेद देणारी आणि अत्यंत वेदनादायक असल्याचे निलम शिर्के यांनी पत्रात म्हटलंय.


महिना 11 लाख रूपये सॅलरी तरीही पैसा पुरेना अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्याने सांगितलं खर्चाच गणित…

मी कोणत्याही राजकीय पक्षाची प्रतिनिधी किंवा सक्रीय सदस्य नाही तर मी केवळ आणि केवळ रंगभूमीवर श्रद्धा ठेवणारी आणि मागील 25 वर्षांपासून रंगभूमीची सेवा करणारी एक महिला कलाकार आहे. याचे देखील भान या विषयाचे राजकारण करणाऱ्या ठेवायला हवे होते, असा सवाल निलम शिर्के यांनी पत्रात उपस्थित केला. आज सकाळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षाताई उसगावकर यांच्यासहित काही ज्येष्ठ रंगकर्मींशी माझी सविस्तर चर्चा झआली आहे. वर्षाताईंसहित चित्रपट आणि नाट्यसृष्टीत कार्यरत असणाऱ्या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांचा सन्मान राखून मी या निवडणुकीत वर्षाताई उसगावकर यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून माझा उमेदवारी अर्ज माघे घेण्याचा कार्यलायीन बाब उद्या पूर्ण करण्यात येईल, असे नीलम शिर्के यांनी म्हटलंय.

follow us