Bhola movie : अजय देवगणच्या भोलामधील तब्बूचा बोल्ड लूक समोर

Bhola movie : अजय देवगणच्या भोलामधील तब्बूचा बोल्ड लूक समोर

मुंबई : ‘दृश्यम 2’ च्या यशानंतर सुपरस्टार अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘भोला’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटातील अभिनेत्री तब्बूचा बोल्ड लूक समोर आला आहे. यामध्ये तब्बू पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा हा पोलीस लूक खुपच किलर आहे. तब्बूसोबत ‘भोला’ मध्ये अजय देवगण धमाल करताना दिसणार आहे.

विशेष म्हणजे अजय देवगणने ‘भोला’चे दिग्दर्शनही केले आहे. या अगोदरच अजय देवगणने आगामी चित्रपट ‘भोला’ चे मोशन पोस्टर रिलीज करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती.

‘भोला’ सिनेमातील मोशन पोस्टवर तब्बूने डोळ्यांवर गॉगल आणि हातात बंदूक घेऊन हटके लूकमध्ये दिसत आहे. तब्बूचे पोस्टर शेअर करताना अजयने लिहिले, ‘एक खाकी-सौ शैतान’. अजयचे पोस्टर रिलीज झाल्यानंतरच हे पोस्टर सोशल मीडियाच्या ट्रेंडिंग लिस्टवर आले आहे.

विशेष म्हणजेच ‘दृश्यम’ नंतर अजय आणि तब्बू ‘भोला’ सिनेमाच्या निमित्याने पुन्हा एकदा एकत्र काम करताना झळकणार आहे. अजय देवगणच्या ‘भोला’चे पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे, त्या पोस्टवर अजयने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘भोला या कलयुगात येत आहे.

अजय हा एक उत्तम अभिनेता तर आहेच पण तो एक उत्तम चित्रपट दिग्दर्शकही आहे. भोला हा अजयचा दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता म्हणून चौथा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या कथेचा आधार एक कैदी आहे जो वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर येतो. प्रथम त्याच्या मुलीला भेटायला जातो जिला त्याने शेवटचे दशकापूर्वी पाहिले होते. पण तिची मुलगी अडचणीत आहे.

तो ड्रग्ज माफियांच्या तावडीत आहे. हा चित्रपट यापूर्वी धर्मेंद्र शर्मा यांनी दिग्दर्शित केला होता. दिग्दर्शन करणार होते. पण जेव्हा निर्मात्यांनी अजय देवगण दिग्दर्शित रनवे 34 हा चित्रपट पाहिला तेव्हा भोलाचे दिग्दर्शनही अजय देवगणकडे सोपवण्यात आले. 30 मार्च 2023 हा चित्रपट रिलिज होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube