RAMAYANA: RISE OF A LEGEND चीन वगळता आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट
RAMAYANA: RISE OF A LEGEND : नमित मल्होत्रा यांच्या या महाकाव्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये 59 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे.
RAMAYANA: RISE OF A LEGEND : नमित मल्होत्रा यांच्या या महाकाव्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये ५९ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे. भारत आणि परदेशातील एकूण कमाईचा विचार करता, हा चित्रपट आतापर्यंतचा पाचवा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. या अभूतपूर्व आंतरराष्ट्रीय यशामागे ‘सोनी पिक्चर्स’ (Sony Pictures) ची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
‘सोनी पिक्चर्स’द्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर वितरित करण्यात आलेल्या या चित्रपटाने एक नवा मैलाचा दगड गाठला आहे. चीन वगळता इतर सर्व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट म्हणून हा चित्रपट समोर आला आहे. ही कामगिरी चित्रपटाची वाढती जागतिक लोकप्रियता दर्शवते आणि भारतीय सिनेमाच्या जागतिक विस्तारामध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे.
अमेरिका आणि कॅनडा (२८.४ दशलक्ष डॉलर्स), थायलंड (१.९ दशलक्ष डॉलर्स), नेपाळ (१.५ दशलक्ष डॉलर्स), इंडोनेशिया (१.२ दशलक्ष डॉलर्स), नेदरलँड्स (६,१०,००० डॉलर्स) आणि कंबोडिया (३,५५,००० डॉलर्स) यांसारख्या अनेक देशांमध्ये हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. इतर प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये युनायटेड किंगडम (६.५ दशलक्ष डॉलर्स), संयुक्त अरब अमिराती – यूएई (५.४ दशलक्ष डॉलर्स), ऑस्ट्रेलिया (५.१ दशलक्ष डॉलर्स), मलेशिया (१.७ दशलक्ष डॉलर्स) आणि जर्मनी (१.२ दशलक्ष डॉलर्स) यांचा समावेश आहे.
विविध देशांमधील या विक्रमी कामगिरीमुळे, ‘रामायण: राईज ऑफ अ लेजेंड’ने भारतीय सिनेमाच्या जागतिक प्रदर्शनासाठी एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. हा चित्रपट लवकरच चीन, जपान आणि दक्षिण कोरियासह अनेक प्रमुख देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे, ज्यामुळे त्याचा जागतिक विस्तार अधिक वाढेल आणि हे महाकाव्य अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल.
गोकुळ ‘अध्यादेशासाठी’ सरकारने मोजले तब्बल 80 लाख ; बंटी पाटील म्हणाले…
‘रामायण: राईज ऑफ अ लेजेंड’ची निर्मिती ‘प्राइम फोकस स्टुडिओज’ (Prime Focus Studios) द्वारे ‘मॉन्स्टर माईंड क्रिएशन्स’ (Monster Mind Creations) आणि ‘डीएनईजी’ (DNEG) यांच्या सहकार्याने करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये याचे वितरण ‘सोनी पिक्चर्स’द्वारे केले जात आहे.