Download App

Adipurush : … म्हणून रावण सीतेला हात लावू शकला नाही, ‘तो’ सीन ट्रोल होताच लेखकांचं स्पष्टीकरण

Adipurush Scene Explain : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा येत्या 16 जूनला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. रिलीज होण्याअगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता चांगलीच सुरुवात झाली आहे. यामध्येच आता आणखी एका सीनवरून नेटकऱ्यांनी या चित्रपटाला ट्रोल केले आहे. मात्र चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशिर यांनी या सीनवर स्पष्टीकरण देत या त्यामागील कारण सांगितलं आहे. ( Ravan kidnap Sita Without touching Adipurush Troll Writer Manoj Muntshir Explain Scene )

‘जुनी जाहिरात आमची नाही पण, नवी जाहिरात आम्हीच दिली’; देसाईंनी सांगतिलं खरं कारण

काय आहे हा सीन?

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या सिनेमामध्ये प्रभास रामाच्या तर कृती सेनन सीता मातेच्या भूमिकेत आहे. तसेच सैफ अली खान रावणाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.तर चित्रपटामध्ये एक सीन दाखवण्यत आलाय. त्यात रावण सीतेच हरण करतो. मात्र तो तिला स्पर्श न करताच आपल्यासोबत लंकेत घेऊन जात आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी या चित्रपटाला ट्रोल केले आहे की, रामानंद सागर यांच्य रामायणात असे झालेच नव्हते. तसेच अनेक तर्क देखील लोकांनी लावले आहेत.

सेना-भाजपच्या युतीत काड्या करणार शकुनी मामा कोण?; राणेंचा रोख नेमका कुणाकडे

त्यादरम्यान या सीनवर चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशिर यांनी एक व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामध्ये त्यांनी रावण सीतेच हरण करतो. मात्र तो तिला स्पर्श न करताच कसं काय? आपल्यासोबत लंकेत घेऊन जात आहे.याच कारण सांगितलं आहे. ते सांगतात की, रावणाने सीतेच्या आधी त्याची सून रंभा हिच्या देखील प्रेमात होता. मात्र तिने त्याला शाप दिला होता की, यापुढे त्याने कोणत्याही स्त्रिला त्याने तिच्या संमतीशिवाय स्पर्श केला तर त्याच्या शरीराचे तुकडे-तुकडे होतील. त्यामुळे रावणाने तिला स्पर्श न करता तिच हरण केलं.असं मनोज यांनी सांगितलं आहे.

‘रामायणा’वर आधारित असलेला हा सिनेमा १६ जून २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘आदिपुरुष’ सिनेमाला सेन्सॉर बोर्डाचं यू सर्टिफिकेट मिळाले आहे.‘आदिपुरुष’चं पोस्टर, ट्रेलर आणि गाणी पसंतीस उतरल्याने चाहते आता सिनेमाची प्रतीक्षा करत असल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us