…म्हणून ‘तुम्बाडची मंजुळा’चा भाग होण्याची इच्छा झाली; सई ताम्हणकरने सांगितला इंटरेस्टिंग अनुभव

Sai Tamhankar हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. त्यानंतर तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील आला आहे. त्यावर आता सई ताम्हणकरने अनुभव शेअर केले.

Sai Tamhankar

Sai Tamhankar shares an interesting experience about be a part of Tumbadchi Manjula : वर्षातील सर्वात मोठ्या मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक ठरल्यानंतर, ‘तुंबाडची मंजुळा’ 7 ऑगस्ट रोजी मराठी Zee5 वर त्याच्या जागतिक डिजिटल प्रीमिअर झाला आहे. हसायला लावणारा भन्नाट विनोदी, अलौकिक वळणे आणि मुळाशी असलेले एक भावनिक कथाबीज असलेला “तुंबाडची मंजुळा” हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आणि आता चित्रपटगृहातील प्रदर्शनादरम्यान समीक्षकांची प्रशंसा आणि प्रेक्षकांचे प्रेम या दोन्ही गोष्टी जिंकल्यानंतर झी ५ मराठीवर झाला आहे. विविध कोरगावकर दिग्दर्शित आणि झी स्टुडिओ निर्मित तुंबाडची मंजुळा या चित्रपटात जितेंद्र जोशी, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, सई तम्हणकर आणि उषा नाडकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यावर अभिनेत्री सई ताम्हणकरने आपले अनुभव शेअर केले.

1. तुमचं पात्र या कथेच्या केंद्रस्थानी आहे. ‘तुम्बाडची मंजुळा’चा भाग होण्याची इच्छा तुम्हाला नेमकी कशामुळे झाली?

शोभा आणि सई हे व्यक्तिमत्त्वाच्या बाबतीत एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत, हीच गोष्ट मला या भूमिकेकडे आकर्षित करणारी होती. शोभा शांत आहे, तिला स्वतःचं मत मोकळेपणाने व्यक्त करता येत नाही आणि तिच्या परिस्थितीमुळे तिला होणारा अन्यायही गिळून गप्प बसावं लागतं. तिच्यातल्या या सगळ्या गोष्टी माझ्या व्यक्तिमत्त्वापेक्षा अगदी वेगळ्या आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीची भूमिका साकारण्याचं आव्हान मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वभावाच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या अगदी विरुद्ध असलेली व्यक्तिरेखा साकारता, तेव्हा अभिनेता म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून त्या पात्राशी एकरूप होणं कधी कधी आव्हानात्मक ठरतं. त्यामुळे सई आणि शोभा यांचा एकमेकांना भेटणारा तो बिंदू पडद्यावर कसा दिसेल, हे अनुभवणं मला खूप रंजक वाटलं.

2. ‘तुम्बाडची मंजुळा’मधला असा एखादा प्रसंग आहे का, जो कॅमेरा बंद झाल्यानंतरही तुमच्या मनात राहिला? तो इतका लक्षात राहण्यामागचं कारण काय?

हो. शोभाचा मामा तिच्यावर जबरदस्ती करतो तो प्रसंग साकारताना खूप, खूप कठीण गेलं. त्या सीनचा शूटिंगनंतरही माझ्यावर परिणाम झाला होता. मात्र उमेश जगताप आणि तो जेवढा उत्तम अभिनेता आहे, त्याच्यामुळेच मी त्या प्रसंगातून बाहेर येऊ शकले. त्या काही क्षणांसाठी मला घरगुती हिंसाचाराला सामोरं जाणाऱ्या अनेक महिलांच्या जागी असल्यासारखं वाटलं—मग ते नात्यातील व्यक्ती असो, जोडीदार असो किंवा नातेवाईक. त्यामुळे हा प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही.

3. प्रत्येक चित्रपट काही खास आठवणी मागे ठेवतो. शूटिंगदरम्यानचा असा कोणता क्षण आहे, जो तुम्ही कायम जपून ठेवाल?

शोभाची भूमिका साकारल्यानंतर मला माझ्या स्वतःच्या सामर्थ्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. मला मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल मनापासून कृतज्ञता वाटली. स्वतंत्र असण्याचं महत्त्वही मला नव्याने जाणवलं, जेणेकरून या गोष्टी आपण कधीही गृहीत धरू नयेत.एक प्रकारे हा अनुभव माझ्यासाठी खूप मोठा लेव्हलर होता.

4. अनेक प्रेक्षक ‘तुम्बाडची मंजुळा’ पहिल्यांदाच Marathi Zee 5 वर पाहणार आहेत. असा एखादा प्रसंग आहे का, जो त्यांनी खास अनुभवावा अशी तुमची इच्छा आहे?

मला वाटतं, संपूर्ण चित्रपटच ट्विस्ट्स आणि सरप्राईजेसनी भरलेला आहे, त्यामुळे एखादा एक प्रसंग निवडणं योग्य ठरणार नाही. मात्र एक प्रेक्षक आणि सहकलाकार म्हणून मकरंद सरांना खूप, खूप दिवसांनी पुन्हा त्यांच्या खास अंदाजात पाहताना मला खूप आनंद झाला.

follow us