Pathan : शाहरुखच्या पठानची एक हजार कोटींकडे वाटचाल !

Pathan : शाहरुखच्या पठानची एक हजार कोटींकडे वाटचाल !

शाहरुख खानचा ( Shahrukh Khan ) पठान ( Pathan ) या सिनेमाने तिसऱ्या आठवड्यात तब्बल 950 कोटींची कमाई केली आहे. यशराज फिल्म्सने हा सिनेमा निर्मित केलेला असून सिद्धार्थ आनंद यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. शाहरुख खानच्या पठाण या सिनेमाने देशभरात वाद निर्माण झाला होता. तरी सुद्धा या सिनेमाने जोरदार कमाई केलेली आहे. तर या आठवड्यात देखील हा सिनेमा अशीच कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.

पठाण सिनेमाने तिसऱ्या रविवारी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. पठानने भारतात रविवारी एका दिवसात 13 कोटी जमा केले आहेत. पठानने आता एकट्या परदेशात $43.54 दशलक्ष कमावले आहेत, तर भारतात नेट कलेक्शन 489.05 कोटी आहे. या सिनेमाने जगभरात 950 कोटी कमावले आहेत.

Marathi Movie : टर्री चित्रपटातील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला…

पठाण हा आता हिंदी चित्रपटांच्या इतिहासात जगभरात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट आहे आणि YRF च्या स्पाय युनिव्हर्सचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. पठाण, आदित्य चोप्राच्या महत्त्वाकांक्षी गुप्तचर विश्वाचा एक भाग आहे आणि त्यात देशातील सर्वात मोठे सुपरस्टार शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube