Single Marathi Movie : ‘सिंगल’ लोकांची भारी स्वारी, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Single Marathi Movie : ‘सिंगल’ लोकांची भारी स्वारी, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Single Marathi Movie : आजकाल कोणी ‘एकटं’ असलं की, लोकांच्या भुवया लगेच उंचावतात. लग्न झालंय की नाही? सिंगल की कमिटेड? अशा प्रश्नांचा भडिमार सुरु होतो. जर या दोन्ही प्रश्नांची उत्तर नकारार्थी, असतील तर विचारूच नका. अशा ‘सिंगल’ असलेल्यांच नेमकं काय होतं? त्यांना कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं? हे दाखवणारा ‘सिंगल’ हा धमाल मराठी चित्रपट 27 ऑक्टोबरला आपल्या भेटीला येतोय.

Ganeshotv 2023 : श्रीगणेशाच्या साक्षीने ‘माझ्या बाप्पाची आली हो स्वारी…’ चे उत्साहात लोकार्पण

या चित्रपटाचं एक आकर्षक पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालंयं. पोस्टर मध्ये एक लालचुटूक हृदय पहायला मिळतंय. ते कोणाचं आहे? त्याचं काय म्हणणं आहे ? हे जाणून घेण्यासाठी दिग्दर्शक चेतन चावडा आणि सागर पाठक यांचा ‘सिंगल’ हा चित्रपट आपल्याला पहावा लागेल. चित्रपटातील कलाकारांची नावे गुलदस्त्यात असल्यामुळे चित्रपटात कोण कलाकार असणार? याची उत्सुकता ही लागून राहिली आहे.

Ritabhari Chakraborty: रिताभरी चक्रवर्तीच स्वप्न साकार;‘जवानच्या डायलॉगची जोरदार चर्चा

तरुण प्रेक्षकांच्या निखळ मनोरंजनासाठी आम्ही ‘सिंगल’ हा चित्रपट आणला आहे. ‘सिंगल’ असलेल्या आणि नसलेल्या प्रत्येकाला हा चित्रपट धमाल अनुभव देईल, असा विश्वास दिग्दर्शक व्यक्त करतात.

किरण काशिनाथ कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, शरद पाटील, अमोल कागणे, गौरी सागर पाठक, ‘सिंगल’ हे या चित्रपटाचे निर्माते असून सह-निर्माते सुमित कदम आहेत. चित्रपटाचं लेखन सतीश समुद्रे यांचे असून पटकथा चेतन चावडा, सागर पाठक आणि सतीश समुद्रे यांची आहे. अभिजीत कवठाळकर, मोहित कुलकर्णी यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube