एका आठवड्यात 50 कोटींहून अधिक व्ह्यूज! ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’च्या ट्रेलर लाँचने रचला इतिहास

Spider-Man: Brand New Day : 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' नवीन इतिहास घडवताना दिसत आहे. जागतिक स्तरावर १ अब्ज (१०० कोटी) व्ह्यूजचा टप्पा

Spider Man

Spider-Man: Brand New Day : ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ नवीन इतिहास घडवताना दिसत आहे. जागतिक स्तरावर 1 अब्ज (100 कोटी) व्ह्यूजचा टप्पा ओलांडणारा पहिला चित्रपट ट्रेलर ठरल्यानंतर, आता या चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरने पहिल्याच आठवड्यात 590.8 दशलक्ष व्ह्यूजचा टप्पा गाठला आहे. ‘डेडलाईन’च्या (Deadline) वृत्तानुसार, हा आतापर्यंतचा दुसरा सर्वात मोठा ट्रेलर लाँच ठरला आहे. हा टप्पा चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय सुपरहिरो फ्रँचायझींपैकी एकाच्या पुढील भागाबद्दल असलेली प्रचंड उत्सुकता आणि प्रतीक्षा दर्शवतो.

‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पीटर पार्करच्या पुढील प्रवासाबाबतची उत्सुकता अधोरेखित करतो, कारण तो यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या अशा नवीन आव्हानांचा सामना करणार आहे. जगभरातील चाहते आपल्या लाडक्या सुपरहिरोच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण तो त्याच्या आतापर्यंतच्या सर्वात भावनिक आणि महत्त्वपूर्ण साहसांपैकी एका प्रवासाला सुरुवात करणार आहे.

डेस्टिन डॅनियल क्रेटन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची पटकथा ख्रिस मॅकेना, एरिक समर्स आणि जस्टिन कुरिट्झकेस यांनी लिहिली आहे. स्टॅन ली आणि स्टीव्ह डिटको यांच्या मार्वल कॉमिक बुकवर आधारित या चित्रपटाची निर्मिती केविन फीगी, एमी पास्कल, ॲव्ही अराड आणि रॅचेल ओ’कॉनर यांनी केली आहे. लुईस डी’एस्पोसिटो आणि डेव्हिड केन हे कार्यकारी निर्माते आहेत. या चित्रपटात टॉम हॉलंड, झेंडाया, सेडी सिंक, जेकब बॅटालॉन, जॉन बर्नथल, ट्रॅमेल टिलमन, मायकल मांडो आणि मार्क रफालो यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट इंडियातर्फे ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ हा चित्रपट 30 जुलै रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाईल.

… तर मोदींचा राजकीय जन्म झाला नसता, भाजप गद्दारी करणारा पक्ष; उद्धव ठाकरे कडाडले

follow us