SVC 59 : विजय देवरकोंडाचे वाढदिनी चाहत्यांना मोठे गिफ्ट, ‘SVC 59’ सिनेमाचा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

SVC 59 : विजय देवरकोंडाचे वाढदिनी चाहत्यांना मोठे गिफ्ट, ‘SVC 59’ सिनेमाचा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

Vijay Deverakonda New Films: विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) हा देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. हा अभिनेता केवळ साउथ इंडस्ट्रीतच प्रसिद्ध नाही तर त्याने बॉलिवूडमध्येही (Bollywood) पदार्पण केले आहे. सध्या अभिनेता आज 9 मे रोजी त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. (SVC59 Film) विजयला त्याच्या खास दिवसानिमित्त (Vijay Deverakonda Birthday) अनेक सेलिब्रिटी आणि चाहते शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्याच्या चाहत्यांना एक मोठी भेट देत निर्माते दिल राजू यांनी विजयच्या आगामी पॅन-इंडियन प्रोजेक्टची घोषणा केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sri Venkateswara Creations (@srivenkateswaracreations)


विजयच्या आगामी पॅन इंडिया चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

विजय देवरकोंडाच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी एक मनोरंजक पोस्टर शेअर करून त्यांच्या पॅन-इंडियन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. विजयच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘SVC 59’ आहे. देवराकोंडाच्या नवीन प्रकल्पाच्या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक आर्टवर्क पोस्टर शेअर केले आहे. ज्यात कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, “रक्तात, तो उठेल, राज्य करेल आणि सर्वत्र सामूहिक लाटा पेटवेल! SVC 59, देवराकोंडाचा सामूहिक अवतार.

पोस्टरमध्ये, विजयची व्यक्तिरेखा एका धगधगत्या पार्श्वभूमीसह हातात खंजीर धरताना दिसत आहे. हे पोस्टर तेलुगू, तमिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेत लाँच करण्यात आले आहे. या सिनेमातील उर्वरित कलाकार आणि क्रूची सर्व माहिती लवकरच शेअर केली जाणार आहे.

चाहते आनंदी

पोस्टर ऑनलाइन लीक झाल्यानंतर लगेचच चाहत्यांनी कमेंट करत विजयच्या नवीन प्रोजेक्टबद्दल आनंद व्यक्त केला. एका चाहत्याने लिहिले आहे की, “अनपेक्षित”, तर दुसऱ्याने लिहिले, “डबल ब्लॉकबस्टर चित्रपट विजय अण्णा.” विजय देवरकोंडाचा हा आगामी ॲक्शन थ्रिलर 2019 च्या ब्लॉकबस्टर राजा वारु राणी गरु फेम दिग्दर्शक रवी किरण कोला यांनी दिग्दर्शित केला आहे.

Sikandar: सलमानच्या चित्रपटात ‘श्रीवल्ली’ची एन्ट्री, ही अनोखी जोडी पहिल्यांदाच दिसणार मोठ्या पडद्यावर

विजय देवरकोंडा यांचे आगामी चित्रपट

परशुराम पेटला यांच्या फॅमिली स्टार ‘फॅमिली स्टार’मध्ये विजय देवरकोंडा शेवटचा दिसला होता. या चित्रपटात विजयसोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत होती. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची कामगिरी फारच खराब होती. विजय लवकरच ‘जर्सी’ प्रसिद्ध दिग्दर्शक गौतम नायडू तिन्नानुरी यांच्या VD12 या तात्पुरत्या शीर्षकाच्या सिनेमातही काम करणार आहे. यापूर्वी अशी अफवा पसरली होती की, विजय सितारा एंटरटेनमेंट नावाने नागा वामसी निर्मित या चित्रपटात गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरी आणि रश्मिका मंदान्ना यांनाही कास्ट करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र निर्मात्यांनी याबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज