जंगली म्युझिकने सर्वात मोठ्या विनोदी चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’चे धमाकेदार टायटल सॉंग केले प्रदर्शित
जंगली म्युजिक आणि टाइम्स म्युजिक यांनी हा बहुचर्चित गाणं रिलीज करताच सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
The explosive title song of ‘Welcome to the Jungle’ released : बॉलिवूडमधील बहुप्रतीक्षित आणि तंगडी स्टारकास्ट असलेल्या वेलकम टू द जंगल या चित्रपटाचं दमदार टायटल ट्रक अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. जंगली म्युजिक आणि टाइम्स म्युजिक यांनी हा बहुचर्चित गाणं रिलीज करताच सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. वर्षातील सर्वात मोठ्या कॉमेडी एंटरटेनरपैकी एक मानल्या जाणाऱ्या या चित्रपटाने आपल्या संगीताच्या जोरावरही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
चित्रपटात अक्षय कुमार यांच्यासोबत सुनील शेट्टी, दिशा पटानी, जॅकलिन फर्नाडिज, अर्शद वारसी, जॅकी श्राफ, परेश रावल, रविना टंडन आणि लारा दत्ता यांसारखे अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत. एवढ्या भव्य कलाकारांच्या उपस्थितीमुळे हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वात मोठ्या मनोरंजनपटांपैकी एक मानला जात आहे.
चित्रपटाचं टायटल ट्रॅक मूळतः साजिद-वाजिद यांनी संगीतबद्ध केलं होतं. आता त्याला संगीतकार विक्रम मोन्ट्रोज यांनी नव्या धाटणीमध्ये रीक्रिएट केलं आहे. हाय-एनर्जी, धमाल, कॉमेडी आणि मोठ्या पडद्यावरील मसालापटाचा फील देणारं हे गाणं प्रेक्षकांना अक्षरशः थिरकायला भाग पाडणारं आहे. या गाण्याला शान, प्रिया पाटीदार आणि स्वतः विक्रम मोंट्रोस यांनी आवाज दिला आहे. गीतकार शब्बीर अहमद यांच्या मूळ गीतांसोबत मेघा बाली यांनी नव्या ओळी जोडल्या असून त्यामुळे हे गाणं अधिक ताजं, आकर्षक आणि लक्षात राहणारं बनलं आहे.
‘वेलकम टू द जंगल’चा संपूर्ण संगीतसंग्रह सहा मोठ्या आणि भव्य गाण्यांनी सजलेला आहे. यात ग्रूव्ह अँथम, ग्लॅमरस डान्स नंबर आणि सिनेमॅटिक म्युझिकल सेटपीसेसचा समावेश आहे. ‘वेलकम’ फ्रँचायझीची संगीत परंपरा कायम राखत हा अल्बम नव्या पिढीच्या प्रेक्षकांनाही आकर्षित करेल, असा विश्वास निर्मात्यांना आहे.
Ajar Baraskar : सेटिंग फिस्कटल्यानेच मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण; अजय बारस्कर महाराजांचा घणाघात…
चित्रपटाचे दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितलं की, “‘वेलकम टू द जंगल’मधील प्रत्येक गाणं हे भव्य, सिनेमॅटिक आणि प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारं असावं, अशी आमची इच्छा होती. या चित्रपटाच्या संपूर्ण वातावरणनिर्मितीत संगीताची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे.” तर संगीतकार विक्रम मोंट्रोस म्हणाले, “मोठ्या बॉलिवूड एंटरटेनर चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना जे काही आवडतं, त्या प्रत्येक गोष्टीचा उत्सव म्हणजे हा साउंडट्रॅक आहे.
गाणी एनर्जेटिक, स्टायलिश, थिएट्रिकल आणि लगेच लक्षात राहतील अशी बनवण्याचा आमचा प्रयत्न होता.” मंदार ठाकूर यांनी देखील प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “‘वेलकम’ फ्रँचायझी कायमच मोठ्या मनोरंजनासाठी ओळखली गेली आहे. ‘वेलकम टू द जंगल’च्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांसाठी तसाच दमदार आणि लक्षात राहणारा संगीत अनुभव घेऊन आलो आहोत.”
फिरोझ नाडियावाला यांच्या निर्मितीत साकारलेला आणि अहमद खान दिग्दर्शित हा चित्रपट यंदाच्या सर्वात मोठ्या कॉमेडी एंटरटेनरपैकी एक मानला जात आहे. चित्रपटाचं टायटल ट्रॅक सध्या सर्व प्रमुख ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असून त्याचा व्हिडीओ टाइम्स म्युजिकच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. कॉमेडी, गोंधळ, नॉस्टॅल्जिया आणि धमाकेदार संगीताचा तडका घेऊन ‘वेलकम’ची दुनिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाली आहे.