क्राइम थ्रिलर वेबसीरिज ‘इन्स्पेक्टर अविनाश सीझन 2’ चा दमदार ट्रेलर अखेर प्रदर्शित

पहिल्या सीझनला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर दुसरा सीझन अधिक भव्य, थरारक आणि भावनिक संघर्षांनी भरलेला असल्याचे ट्रेलरमधून दिसून येत आहे.

Untitled Design (44)

The powerful trailer of ‘Inspector Avinash Season 2’ is finally released : बहुप्रतीक्षित क्राइम थ्रिलर वेबसीरिज ‘इन्स्पेक्टर अविनाश सीझन 2’ चा दमदार ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून, अभिनेता रणदीप हुडा पुन्हा एकदा इन्स्पेक्टर अविनाश मिश्रा यांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्या सीझनला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता दुसरा सीझन अधिक भव्य, अधिक थरारक आणि भावनिक संघर्षांनी भरलेला असल्याचे ट्रेलरमधून दिसून येत आहे. ही सिरीज 15 मे 2026 पासून जीओ हॉटस्टार वर प्रदर्शित होणार आहे.

नीरज पाठक दिग्दर्शित या सिरीजमध्ये उर्वशी रौतेला, अमित सियाल, अभिमन्यू सिंह, रजनीश दुग्गल, शालिन भनोट आणि फ्रेडी दारूवाला यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 1990 च्या दशकातील उत्तर प्रदेशच्या अस्थिर आणि गुन्हेगारीने ग्रासलेल्या पार्श्वभूमीवर आधारित या सीझनमध्ये इन्स्पेक्टर अविनाश मिश्रा एका अशा संघर्षात अडकलेला दिसतो, जो फक्त कायद्याविरोधातील लढा नसून त्याच्या वैयक्तिक आयुष्यालाही हादरवणारा आहे. त्याच्या मुलावर खुनाचा आरोप लागतो, तर दुसरीकडे त्याचे वैवाहिक आयुष्यही संकटात सापडते.

अशा परिस्थितीत अविनाशला स्वतःच्या कुटुंबासाठी, सत्यासाठी आणि अस्तित्वासाठी लढावे लागते. ट्रेलरमध्ये अविनाश आणि गुन्हेगारी, राजकारण तसेच भ्रष्ट व्यवस्थेच्या शक्तिशाली गठबंधनातील जबरदस्त संघर्ष दाखवण्यात आला आहे. ‘शेख’ आणि रहस्यमय ‘देवी’ हे दोन गुन्हेगारी चेहरे घातक शस्त्रास्त्रांच्या साम्राज्याचा विस्तार करत असताना, मित्र आणि शत्रू यांच्यातील सीमारेषा धूसर होताना दिसतात. व्यवस्थेतीलच काही लोकांचा विश्वासघात झाल्यानंतर अविनाशला निलंबन आणि अटकेलाही सामोरे जावे लागते. त्यामुळे तो एका मोठ्या राजकीय आणि गुन्हेगारी खेळातील प्यादे बनतो.

बीडच्या कोट्यवधींच्या भूसंपादन घोटाळ्यात मोठी कारवाई; तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूरमधून अटक

या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणावर अ‍ॅक्शन, स्फोटक संघर्ष, भावनिक प्रसंग आणि थरारक ट्विस्ट्स पाहायला मिळणार असल्याचे ट्रेलरमधून स्पष्ट होते. न्यायासाठीची किंमत किती मोठी असू शकते, याचाही प्रभावी वेध या कथेत घेण्यात आला आहे. या भूमिकेबद्दल बोलताना रणदीप हुडा म्हणाला, “या सीझनमध्ये अविनाशच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभाच उलगडला जातो. तो आता केवळ गुन्हेगारांविरोधात लढत नाही, तर आपल्या कुटुंबासाठी, सत्यासाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करतो आहे. या वेळी अ‍ॅक्शन अधिक रॉ आहे आणि भावना अधिक तीव्र आहेत.”

तर उर्वशी रौतेला म्हणाली, “इन्स्पेक्टर अविनाश सीझन 2 हा अधिक मोठा, धाडसी आणि स्फोटक अनुभव आहे. अ‍ॅक्शन, भावना आणि अनपेक्षित वळणांनी भरलेल्या या कथेत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता.” दिग्दर्शक नीरज पाठक यांनी सांगितले की, “पहिल्या सीझनमध्ये जे काही प्रेक्षकांना आवडले, त्याला या वेळी आणखी तीव्र आणि अस्थिर स्वरूप देण्यात आले आहे. यावेळी अविनाश केवळ गुन्हेगारांविरोधात नाही, तर ढासळणाऱ्या व्यवस्थेविरोधातही उभा आहे.”

ट्रेलर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

View this post on Instagram

 

A post shared by JioHotstar (@jiohotstar)

follow us