‘हॅशटॅग तदेव लग्नम’ च्या ट्रेलरला सोशल मीडियावर जबरदस्त रिस्पॉन्स, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Hashtag Tadev Lagnam : बहुप्रतीक्षित ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर या ट्रेलरला जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर शुभम फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ (Hashtag Tadev Lagnam) चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता वाढली आहे. तसेच सोशल मीडियावर (Social Media) या चित्रपटाच्याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे.
तर दुसरीकडे ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’च्या निमित्ताने सुबोध भावे (Subodh Bhave) आणि तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) ही जोडीही पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार आहे. तसेच या चित्रपटात प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, शर्मिष्ठा राऊत देखील दिसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर नक्कीच निर्माण करेल अशी चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे शेखर विठ्ठल मते निर्माते असून आनंद दिलीप गोखले दिग्दर्शक आहे.
ट्रेलरमध्ये अथश्री आणि गायत्री ही दोन परस्पर विरोधी व्यक्तिमत्वं त्यांच्या लग्नासाठी एकमेकांना पहिल्यांदा भेटताना दिसत असून या दरम्यान काही गंमतीशीर घटना घडताना दिसत आहेत. दोघांचे विचार एकमेकांसोबत शेअर करत असतानाच त्यांच्या आयुष्यातील काही रहस्येही समोर येत आहेत. त्यामुळे यात धमाल तर आहेच तसेच काही ट्विस्टही अनुभवायला मिळणार आहेत.
या सगळ्यातून अथश्री आणि गायत्री यांचे लग्न होणार का? हे पाहाण्यासाठी प्रेक्षकांना 20 डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, “आजच्या काळात लग्न करताना एकमेकांत बघितल्या जाणाऱ्या गोष्टींवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. लग्न करताना आता तरुणांची विचारसरणी बदलली आहे, त्यांचा लग्नाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन खूप वेगळा झाला आहे.
महायुती सरकार राज्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल, आशुतोष काळेंना विश्वास
हा सिनेमा तरुणांना विशेष जवळचा वाटेल. असे असले तरी संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा हा चित्रपट आहे. यात मजा, धमाल तर आहेच प्रसंगी प्रेक्षकांना हळवाही बनवेल. कथानकात सुबोध आणि तेजश्रीच्या जबरदस्त अभिनयाने अधिकच रंगत आणली आहे.” निर्माते शेखर मते म्हणतात, ‘’विषय थोडा नाजूक असला तरी अतिशय मजेशीर पद्धतीने तो यात मांडण्यात आला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल.’’