चित्रविचित्र कपडे घालून Uorfi Javed महिन्याला कमावते ‘इतके’ रुपये, कमाईच्याबाबत ‘या’ अभिनेत्रींनाही टाकते मागे

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 29T180205.349

Uorfi Javed: उर्फी जावेद ही नेहमी तिच्या अतरंगी लूकसाठी ओळखली जात असते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तिचे फॅन फाॅलोइंग पाहायला मिळेल. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही बिग बाॅस ओटीटीपासून खास ओळख निर्माण केली आहे. ती फक्त बिग बाॅस (Bigg Boss) ओटीटीच नाही तर उर्फी जावेद ही अनेक सिरीयलमध्ये महत्वाच्या भूमिकादेखील करत असल्याचे दिसून येत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)


उर्फी जावेद हिला कायमच तिच्या कपड्यांमुळे जीवे मारण्याच्या धमक्या (Threats) येत असतात. मात्र या धमक्यांचा उर्फी जावेद हिच्यावर कोणताही परिणाम होत नाही. दररोज उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी लूकमध्ये चाहत्यांना घायाळ करत असते. बरेच चाहते उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे खडेबोल सुनावताना देखील दिसून येतात. अगदी कमी काळामध्ये उर्फी जावेद हिने आपल्या स्टाईलच्या जोरावर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

उर्फी जावेद हिला तब्बल ४० लाख लोक फाॅलो करत असल्याचे दिसून येत आहे. आपल्या चाहत्यांसाठी उर्फी जावेद ही सतत बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असल्याचे आपल्याला दिसून येईल. उर्फी जावेद हिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत.

तुम्हाला देखील हे जाणून नक्कीच आर्श्चयाचा धक्का बसला असेल, मात्र उर्फी जावेद ही तब्बल कोट्यावधी संपत्तीची मालकीन आहे. उर्फी जावेद ही महिन्याला तब्बल २ कोटी रूपये कमावते. एवढंच नाही तर एका दिवसाला उर्फी जावेद ही ५ ते ६ लाखाची कमाई करते. उर्फी जावेद ही तब्बल १७२ कोटींची मालकीन आहे. उर्फी जावेद ही कमाईमध्ये अनेक बाॅलिवूड अभिनेत्रींना देखील मागे टाकले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)


उर्फी जावेद ही सर्वात जास्त पैसे सोशल मीडियावरून कमावत असल्याचे सांगितले जाते. एवढंच नाहीतर अनेक जाहिराती आणि शोच्या माध्यमातून ती मोठी कमाई करताना दिसून येते. उर्फी जावेद हिच्या एका महिन्याच्या कमाईमध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये घर खरेदी केले जाऊ शकते. उर्फी जावेद हिच्यावर नेहमीच तिच्या कपड्यांमुळे ट्रोल केले जाते.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने शर्ट न घातला एक फोटोशूट केले होते. यामध्ये उर्फी जावेद हिच्या हातामध्ये फक्त नाश्त्याच्या प्लेट या दिसत होत्या. उर्फी जावेद हिने या फोटोशूटचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यानंतर उर्फी जावेद हिच्यावर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.

Tags

follow us