Uorfi Javed : “मुस्लिमाच्या नावावर…; उर्फी जावेदच्या ‘त्या ‘व्हिडिओवर चाहते संतापले

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 10T143935.080

Uorfi Javed Video: आपल्या बोल्ड लूकने सोशल मीडियावर खळबळ माजवणाऱ्या उर्फी जावेदने (Uorfi Javed) आपल्या फॅशन स्टेटमेंटने कधीही कोणाला कंटाळा आणला नाही. (Uorfi Javed Look) उर्फी जावेद नेहमीच नवीन लुक्सने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)


तिला विरोध करणारे देखील तिच्या नव्या फोटो- व्हिडिओची वाट बघत असतात. उर्फी जावेदच्या या नव्या व्हिडिओने चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओमध्ये सर्वांच्या नजरा फक्त तिच्या आउटफिटवर आहेत, यामुळे उर्फी जावेद चर्चेत आहे. परंतु यावेळी उर्फीचे शरीर कपड्याने नाही तर फुलांनी झाकले असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे.

उर्फी जावेद तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत राहते. विचित्र कपडे परिधान करून ती गर्दीत मोठ्या आत्मविश्वासाने फिरते आणि तिच्या चाहत्यांना तिची ही शैली आवडते. यावेळी उर्फीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती तिचे अर्धे शरीर हाताने झाकताना दिसत आहे, तर बाकीचे अंग फुलांच्या गजऱ्याने लपवताना दिसत आहे. या व्हिडिओवरून उर्फीला जावेदला चाहत्यांनी प्रचंड ट्रोल केले जात आहे.

Akshay Kumar : 55 वर्षीय खिलाडीला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं महागात; व्हिडीओ पाहून चाहते भडकले

उर्फी जावेद पुन्हा अडचणीत

उर्फीचा हा व्हिडीओ रमजानच्या मुहूर्तावर समोर आला असून, त्यामुळे युजर्स अधिकच भडकले आहेत. उर्फीच्या या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘कृपया रमजानची काळजी घ्या.’ तर , दुसर्‍या यूजरने लिहिले आहे की, ‘अरे, रमजान चालू आहे, याला वरच्याची पर्वा नाही. लोक तिच्याबद्दल काय विचार करतात आणि काय म्हणतात याची उर्फीला अजिबात पर्वा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Nayanthara: “आणखी किती फोटो काढणार?” चाहत्यावर नयनतारा भडकली

असा एकही दिवस जात नाही की, उर्फी जावेद तिच्या इंस्टाग्रामवर कोणताही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत नाही. उर्फीची स्तुती करणाऱ्यांची कमी नाही. काही लोक तिचा ड्रेसिंग सेन्सही फॉलो करतात. हेच कारण आहे की तिचा कोणताही फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताच तो लगेच व्हायरल होतो. आणि यावरून तिला ट्रोल केले जाते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube