“ये रिश्ता क्या कहलाता है” मध्ये अभिराचा नवा मेकॅनिक लूक ठरणार एका नव्या पर्वाची सुरुवात!

Yeh Rishta Kya Kehlata Hai : मालिका विश्वात कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार चॅनल म्हणजे स्टार प्लस ! स्टार प्लसची दीर्घकाळ चालणारी

  • Written By: Published:
Yeh Rishta Kya Kehlata Hai

Yeh Rishta Kya Kehlata Hai : मालिका विश्वात कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार चॅनल म्हणजे स्टार प्लस ! स्टार प्लसची दीर्घकाळ चालणारी लोकप्रिय मालिका “ये रिश्ता क्या कहलाता है” ने धाडसी असा आठ वर्षांचा लीप घेत अभिराच्या आयुष्यातील एका शक्तिशाली नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे. या लीपनंतर कथे मध्ये अभिरा आणि अरमान वेगवेगळ्या आयुष्यांत जगताना दिसतात अभिरा तिची मुलगी वाणीसोबत राहते तर अरमान मायरासोबत. भावनिक दुरावा आणि बदललेल्या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर अभिरा अधिक मजबूत रूपात समोर येताना दिसते. ती एक अशी नवी ओळख स्वीकारते जी प्रेरणादायीही आणि प्रभावी देखील आहे.

आता अभिरा मेकॅनिक म्हणून काम करताना बघायला मिळणार असून ती एक साधं गॅरेज चालवते आणि एक हाती स्वतःसह आपल्या मुलीचा सांभाळ करते. ग्रीस लागलेले हात, साधं राहणीमान, साधे कपडे आणि निर्धारलेले डोळे हा तिचा मेकॅनिक लूक तिची जिद्द स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेचं प्रतीक ठरते. पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन तिने निवडलेला हा मार्ग विभक्त झालेल्या स्त्रीचं हे सशक्त चित्रण दाखवते आहे.

अभिराच्या या नव्या व्यवसायाबद्दल बोलताना ही भूमिका साकारणारी समृद्धी शुक्ला सांगते “गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करणं सोपं नाही खूप मेहनत असते . मोबदला कमी असला तरीही कठीण परिस्थितीतसुद्धा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधता येतो आणि आनंदी राहता येतं हे अभिरा दाखवून देते”

या भूमिकेच्या आणि अभिराच्या तयारीबद्दल बोलताना ती पुढे म्हणते “दोन मोठे लीप घेऊन सात-आठ वर्षा नंतर अभिरासारख्या व्यक्तिरेखेसाठी तयार होण हे मानसिक आणि भावनिक पद्धतीने खूप आव्हानात्मक होत. वय तेच ठेवून त्या भूमिकेत एक नवी परिपक्वता दाखवणं आणि प्रेक्षकांना तिच्या प्रवासातील बदल आणि परिपक्वता जाणवावी यासाठी मी अभिनयात सूक्ष्म पण जाणवेल असे जाणीवपूर्वक बदल केले आहेत.

मात्र अभिराच्या भावनिक जगाचं केंद्र म्हणजे मातृत्व तिच्या संवेदनशीलतेबद्दल बोलताना समृद्धी म्हणते “अभिरा कधीच परिस्थितीसमोर झुकत नाही ती नेहमी लढत आणि आज ती मेकॅनिक म्हणून काम करते. मजबूत, लक्ष केंद्रीत करून व्यवहार्य आणि सतत धडपड करून जगणारी तिची ही गोष्ट आहे”

शेवटी ती म्हणते “तुम्ही सर्व काही गमावू शकता कुटुंब, पैसा, जोडीदार, अगदी तुमचं मूलसुद्धा पण जर लढण्याची ताकद तुमच्यात असेल तर पुन्हा उभं राहणं शक्य असतं. अभिरा कठीण काळात टिकून राहण्याची आणि पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा आणि शिकवण देते”

‘किंग’च्या आंतरराष्ट्रीय वितरणासाठी रेड चिलीज एंटरटेनमेंट, मार्फ्लिक्स पिक्चर्स अन् यशराज फिल्म्सची ऐतिहासिक भागीदारी-

या शोमध्ये समृद्धी शुक्ला अभिराच्या भूमिकेत, सारा किल्लेदार वाणीच्या भूमिकेत असून रोहित पुरोहित अरमानच्या भूमिकेत आणि अर्शिया शर्मा मायराच्या भूमिकेत दिसणार आहेत. “ये रिश्ता क्या कहलाता है” बघायला विसरू नका दररोज रात्री 9:30 वाजता फक्त स्टार प्लसवर !

follow us