Photos : ‘क्लासिक फियाटची वारी, महाबळेश्वरच्या वाटेवरी’ 20 हून अधिक गाड्यांनी वेधलं लक्ष
‘क्लासिक फियाटची वारी, महाबळेश्वरच्या वाटेवरी’ या रॅलीत 1955 पासूनच्या विविध मॉडेल्सच्या 20 हून अधिक क्लासिक गाड्यांनी सहभाग घेतला.
जुन्या काळाचा रुबाब, चमकदार क्रोमची किनार, गोलाईदार बॉडी, शांत पण दमदार इंजिनाचा आवाज, हलके स्टिअरिंग आणि क्लासिक हॅन्डगिअर… अशा देखण्या फियाट गाड्यांचा अनोखा नजराणा पुणेकरांना अनुभवायला मिळाला.
रॅलीचे आयोजक संजय प्रकाश ढेरे म्हणाले, “क्लासिक वाहनांचा वारसा जतन करणे आणि तरुण पिढीत या गाड्यांविषयी आकर्षण निर्माण करणे हा आमचा मुख्य हेतू आहे. अशा उपक्रमांमुळे वाहनप्रेमी एकत्र येतात आणि ऐतिहासिक वाहनसंस्कृती जिवंत राहते.
Fiat Classic Car Club of India यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘क्लासिक फियाटची वारी, महाबळेश्वरच्या वाटेवरी’ या रॅलीत १९५५ पासूनच्या विविध मॉडेल्सच्या २० हून अधिक क्लासिक गाड्यांनी सहभाग घेतला.
पुणे शहरातून निघालेला हा ताफा निसर्गरम्य घाटमार्गाने Mahabaleshwar कडे रवाना झाला. रस्त्याच्या कडेला उभे राहून नागरिकांनी या देखण्या गाड्यांचे छायाचित्रण केले, तर वाहनप्रेमींनी टाळ्यांच्या गजरात सहभागींना दाद दिली.
सहभागी शीतल सोनकांबळे यांनी सांगितले की, माझ्याकडे १९९१ मधील फियाट कार आहे. ही गाडी आमच्या कुटुंबासाठी केवळ वाहन नसून आठवणींचा ठेवा आहे. तिची देखभाल आम्ही स्वतः करतो. अशा रॅलीत सहभागी होताना तिचा खरा आनंद अनुभवायला मिळतो.
क्लासिक फियाट गाड्यांच्या या वारीने पुणेकरांना जुन्या आठवणींमध्ये रमवले आणि ऑटोमोबाईल इतिहासाचा थेट अनुभव देत महाबळेश्वरच्या दिशेने एक देखणा प्रवास घडवून आणला.
