Download App

कोरोनाच्या उद्रेकानंतर तब्बल तीन वर्षांनी चीन पर्यटकांसाठी खुल्या करणार सीमा

  • Written By: Last Updated:

बीजिंग: चीन (China) सरकारने आता आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सीमा पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला. कोविड-19 (Covid-19) या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यापासून तीन वर्षांत पहिल्यांदा बुधवारपासून सर्व प्रकारचे व्हिसा जारी करून आपली सीमा परदेशी पर्यटकांसाठी पुन्हा उघडणार असल्याचे चीनने म्हटलं.

तीन वर्षापूर्वी म्हणजे 2019 साली संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी करत असतांनाच जगावर कोविडचं संकट आलं. याचा फटका सगळ्याच देशांना बसला होता. नंतर कोविडपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक देशानं आपापल्यापरिनं उपाययोजना करुन या जीवघेण्या विषाणूवर विजय मिळवला होता. मात्र, चीनला पूर्णपणे कोविडवर नियंत्रण मिळवण्यात यश आले नव्हते. चीनमध्ये कोविड निर्बंधात काहीशी सूट दिल्यानंतर पुन्हा कोरोनाचा कहर वाढला होता. त्यामुळे चीनमध्ये परिस्थिती नियंत्रण बाहेर गेली होती. आणि या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परदेशी पर्यंटना चीनमध्ये प्रवेश करण्यास बंदी होती. त्यासाठी चीनने आपल्या सीमा परदेशी पर्यंटकांसाठी बंद केल्या होत्या.

दरम्यान, आता कोविड -19 विरूद्ध बचाव करण्यासाठी लादण्यात आलेला हा शेवटचा सीमापार नियंत्रण उपाय काढून टाकण्याची प्रक्रिया गेल्या महिन्यात सुरु झाली होती. चीनी आरोग्य अधिकाऱ्यांनी कोविड व्हायरसच्या वाढीवर नियंत्रण मिळवल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर चीन सरकारने सीमा खु्ल्या करण्याचा निर्णय घेतला होता.

Budget Session 2023 : जुन्या पेन्शनवरुन विधानपरिषदेत विरोधकांचा सभात्याग

चीन सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल, असं वाटतं. चीनच्या या निर्णयामुळे $17 ट्रिलियनची अर्थव्यवस्था पुन्हा जागृत होण्यास मदत मोठी मदत होणार आहे.

चीनमधील ज्या भागात साथीच्या रोगापूर्वी व्हिसा आवश्यक नव्हता, ते प्रदेश व्हिसा-मुक्त प्रवेशावर परत येतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी सांगितले. यामध्ये दक्षिणेकडील हेनानचे पर्यटन बेट आणि शांघाय बंदरातून जाणाऱ्या क्रूझ जहाजांचा समावेश आहे.

हाँगकाँग आणि मकाऊ येथील परदेशी लोकांसाठी ग्वांगडोंगच्या दक्षिणेकडील उत्पादन केंद्रामध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश देखील पुन्हा सुरू केला जाईल. मंत्रालयाने असेही सांगितले की, 28 मार्च 2020 पूर्वी जारी केलेले व्हिसा धारण केलेले परदेशी लोक देखील चीनमध्ये प्रवेश करू शकतील.

Tags

follow us