Pakistan Afghanistan War : पाकिस्तान – अफगाणिस्तान युद्धात इराणची एन्ट्री; दिली मोठी ऑफर

Pakistan Afghanistan War :  भारताच्या शेजारील राष्ट्र पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सीमा वादावरुन संघर्ष वाढला आहे. पाकिस्तानकडून

  • Written By: Published:
Pakistan Afghanistan War

Pakistan Afghanistan War :  भारताच्या शेजारील राष्ट्र पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सीमा वादावरुन संघर्ष वाढला आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्याला अफगाणिस्तानकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानचे 55 सैनिकांना मारले आहे. यानंतर गुरुवारी पहाटे पाकिस्तानने ऑपरेशन गझब लिल हक अंतर्गत प्रतिहल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत अफगाणिस्तानचे 130 सैनिक मारले गेले असल्याची माहिती आहे.

तर दुसरीकडे पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी (Asif Ali Zardari) यांनी अफगाणिस्तानच्या हल्ल्याचे वर्णन सार्वभौमत्वावर हल्ला असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ (Khwaja Asif) यांनीही अफगाण तालिबानविरुद्ध “खुले युद्ध” घोषित केले आहे.

 तालिबान घेणार बदला

पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या (Pakistan Afghanistan War) या हल्ल्याला विनाकारण हल्ला म्हटले आणि लष्कराला त्वरित प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी सांगितले की ते देशाच्या एकता, सार्वभौमत्व आणि शांततेशी तडजोड करणार नाहीत. दरम्यान, तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी सार्वभौमत्वाचे रक्षण करताना पाकिस्तानला कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला.  गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान डुरंड रेषावरून वाद सुरु आहे.

युद्धात इराणची एन्ट्री

तर दुसरीकडे या युद्धात इराणची देखील एन्ट्री झाली आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरघची यांनी पाक-अफगाण मतभेद सोडवण्यास मदत करण्याची ऑफर दिली आहे. त्यांनी सांगितले की, पवित्र रमजान महिन्यात लढाई न्याय्य आहे. रमजान हा इस्लामिक ऐक्य मजबूत करण्यासाठी समर्पित महिना आहे. म्हणून, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानने चांगले शेजारी म्हणून संवादाद्वारे त्यांचे मतभेद सोडवावेत. दोन्ही देशांमधील संवाद सुलभ करण्यासाठी आणि समज आणि सहकार्य मजबूत करण्यासाठी इराण कोणतीही मदत करण्यास तयार आहे असं त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानकडून सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांना फोन

तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्षादरम्यान, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांना फोन केला. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने याची पुष्टी केली आणि सांगितले की दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक विकास आणि सुरक्षिततेबद्दल चर्चा केली. त्यांनी अफगाणिस्तानमधील संघर्षावरही चर्चा केली.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाचे फोटो अखेर समोर

follow us