Somaliland Dispute :  युद्धानंतर आता नवीन वाद; इस्त्रायलचा मोठा निर्णय अन् 16 मुस्लिम देश भडकले, प्रकरण काय?

Somaliland Disput :  अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या इराण, अमेरिका आणि इस्त्रायल युद्ध नुकतंच संपले असून पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्था

Somaliland Dispute

Somaliland Dispute :  अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या इराण, अमेरिका आणि इस्त्रायल युद्ध नुकतंच संपले असून पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्था सुरळीत होताना दिसत आहे. तर युद्धविरामसाठी इराण आणि अमेरिकेत चर्चा देखील सुरु आहे. तर दुसरीकडे आता पुन्हा एकदा जागतिक पातळीवर इस्त्रायल चर्चेत आहे. इस्त्रायलने मोठा निर्णय घेत सोमालीलँडमध्ये राजनैतिक दूत  नियुक्त करण्याची माहिती दिली आहे. मात्र इस्त्रायलच्या या निर्णयानंतर 16 मुस्लिम देश भडकले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद तीव्र होताना दिसत आहे.

तब्बल 16 अरब देशांनी इस्त्रायलच्या या निर्णयाचा विरोध करत निषेध नोंदवला आहे. सोमालियाच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे हे उल्लंघन असल्याचे अरब देशांकडून सांगण्यात आले आहे. या वादावर कतार, सौदी अरेबिया, इजिप्त, पाकिस्तान, तुर्की, इंडोनेशिया, जॉर्डन, कुवेत, ओमान आणि इतर राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले. या निवेदनात  इस्रायलने उचललेले हे पाऊल आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या (UN) तत्त्वांच्या विरोधात आहे असं म्हटले आहे.

निवेदनात काय ?

सोमालीलँडला एक स्वतंत्र घटक म्हणून मान्यता देणे हे केवळ सोमालियाच्या एकतेलाच कमकुवत करत नाही, तर ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ क्षेत्रातील अस्थिरताही वाढवू शकते, असा युक्तिवाद या राष्ट्रांनी केला आहे. अशा प्रकारचे एकतर्फी निर्णय प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेसाठी हानिकारक ठरू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सोमालियाचे कायदेशीर सरकार हेच तेथील जनतेचे एकमेव प्रतिनिधी आहे आणि कोणत्याही बाह्य राष्ट्राने फुटीरतावादी क्षेत्राशी थेट संबंध ठेवणे अस्वीकार्य आहे, असेही या संयुक्त निवेदनात ठामपणे मांडण्यात आले आहे.

सोमालीलँडची प्रतिक्रिया काय ?

सोमालीलँडने 1991 मध्येच सोमालियापासून आपले स्वातंत्र्य घोषित केले होते.  आजवर संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्याही सदस्य राष्ट्राकडून त्याला व्यापक राजनैतिक मान्यता मिळालेली नाही. असे असूनही, इस्रायलने अलीकडेच सोमालीलँडला एक स्वतंत्र घटक म्हणून मान्यता देण्याचा आणि तिथे आपले राजनैतिक प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण घडामोडींवर सोमालीलँडनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“कापूसकोंडा” चित्रपटातून तब्बल 22 वर्षांनी सचिन पिळगांवकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र-

या राष्ट्रांनी लावलेले आरोप फेटाळून लावत सोमालीलँडने म्हटले आहे की, आम्ही एक स्थिर, लोकशाहीवादी आणि दहशतवादमुक्त प्रदेश आहोत आणि इस्रायलसोबतचे आमचे संबंध हे परस्पर हितावर आधारित आहेत.

follow us