जपान हादरलं! सानरिकू किनाऱ्याजवळ समुद्रात 7.5 तीव्रतेचा भूकंप; किनारपट्टी भागात अलर्ट जारी

या भूकंपाचे केंद्र समुद्राच्या पृष्ठभागाखाली अवघ्या 10 किलोमीटर खोलीवर असल्याचे जपानच्या हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 14

Major earthquake under the sea in Japan : जपानमध्ये आज पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले असून, ईशान्येकडील सानरिकू किनाऱ्याजवळ मोठा भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. आज, 20 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजून 53 मिनिटांनी (जपानी प्रमाणवेळेनुसार) जपानच्या ईशान्य भागात समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या सानरिकू परिसराच्या जवळ समुद्रात 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र समुद्राच्या पृष्ठभागाखाली अवघ्या 10 किलोमीटर खोलीवर असल्याचे जपानच्या हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

जपान मेटेओरोलॉजीकल एजन्सीने या भूकंपानंतर तातडीने सतर्कता बाळगत जपानच्या किनारपट्टी भागांसाठी त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. भूकंपाची तीव्रता आणि त्याचे केंद्र समुद्रात असल्यामुळे त्सुनामीची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा अलर्ट दिला आहे. सध्या तरी या भूकंपामुळे कोणतीही मोठी जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. किनारपट्टी भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे.

अमरावती से** स्कँडल : अलिशान थार, पैशांची बंडलं अन् पिस्तुलाचा धाक; अयान अहमदची संपूर्ण कुंडली

जपान हा भूकंपप्रवण देश म्हणून ओळखला जातो.पॅसिफिक रिंग ऑफ फायरमध्ये असल्यामुळे येथे वारंवार भूकंप होतात. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीसाठी जपानकडे अत्याधुनिक पूर्वसूचना प्रणाली आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत आहे. दरम्यान, नागरिकांना घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही तास महत्वाचे मानले जात असून, त्सुनामीचा धोका लक्षात घेता किनारपट्टी भागात विशेष सतर्कता ठेवण्यात आली आहे. या घटनेबाबत अधिक माहिती आणि नुकसानीचे अचूक चित्र काही वेळात स्पष्ट होण्याची शकयता आहे.

follow us