Zuckerberg Became Father : मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांना तिसऱ्यांदा कन्यारत्न

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 27T102426.423

अमेरिका : मेटा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि फेसबुकचे (Facebook) संस्थापक मार्क झुकरबर्ग (mark zuckerberg) यांना तिसऱ्यांदा कन्यारत्नाचे स्वागत केले आहे. (Zuckerberg Became Father ) मार्क यांची पत्नी डॉ. प्रिसिला चॅन यांनी आजून एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. (Meta) त्यांनी मिळून या मुलीचे नाव ‘ऑरेलिया चॅन झुकरबर्ग’ असे ठेवण्यात आले आहे. सोशल मीडियावर आपल्या तिसऱ्या कन्येबरोबरचा फोटो शेअर करत त्यांनी सर्वांना ही आनंदाची बातमी सांगितली.

त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये मार्क त्यांच्या मुलीकडे पाहत बेडवर झोपलेले दिसून येत आहेत. त्यांनी एका हातांनी ऑरेलियाला धरले आहे. मुलीकडे बघताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद फोटोमधून पाहायला मिळत आहे. दुसरा फोटो प्रिसिला यांचा आहे. यामध्ये त्यांनी ऑरेलियाला कुशीत घेतले आहे असे दिसते. या पोस्टला मार्क यांनी “ऑरेलिया चॅन झुकरबर्ग, तुझं या जगामध्ये स्वागत आहे. तुझे आगमन आमच्याकरिता देवाच्या आशीर्वादाप्रमाणे आहे, असे कॅप्शन लिहिले आहे. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. बरेच युजर्स यावर कमेंट करुन त्यांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देत आहेत.

Tunisia Coast Boat : ट्युनिशियाच्या किनाऱ्यावर बोट उलटली, 28 प्रवाशांचा मृत्यू; 60 हून अधिक बेपत्ता

सप्टेंबर २०२२ मध्ये मार्क यांनी प्रिसिला गरोदर असल्याची माहिती त्यांनी दिली होती. तेव्हा त्यांनी पोस्टमध्ये ‘मी तिसऱ्यांदा बाबा होणार आहे’ असे सांगण्यात आले होते. झुकरबर्ग दापंत्याला आता एकूण ३ मुली आहेत. त्यांच्या पहिल्या मुलीचे नाव मॅक्स असे आहे. मॅक्स ७ वर्षांची आहे. २०१२ मध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलीचा म्हणजेच ऑगस्टचा जन्म झाला. ती ५ वर्षांची आहे. आता ऑरेलियाच्या रुपामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये नवा सदस्याचे आगमन झाले आहे.

मार्क आणि प्रिसिला यांची भेट कॉलेजमध्ये असताना झाली. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एका पार्टीत ते पहिल्याच वेळेस भेटले होते. २००३ पासून त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. मे २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. मागील वर्षी त्यांच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत.

Tags

follow us