- Letsupp »
- international
विदेश
-
नेपाळमध्ये प्रवाशी विमान कोसळलं; 32 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : नेपाळमधील पोखरा येथे प्रवाशी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. धावपट्टीवर पोहोचण्यापूर्वीच विमान कोसळले. या अपघातात आतापर्यंत 32 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विमानात 72 जण असल्याची माहिती समोर येत असून मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. नेपाळमधील पोखरा येथे प्रवासी विमान कोसळले असून त्यात एकूण 68 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर […]
-
आठव्या वंदे भारत ट्रेनला मोदी आज हिरवा झेंडा दाखवणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणाला मोठी भेट देणार आहेत. सिकंदराबाद ते विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला पंतप्रधान आज हिरवा झेंडा दाखवतील. सिकंदराबाद ते विशाखापट्टणमला जोडणारी ही ट्रेन पोंगलच्या शुभमुहूर्तावर सुरू होईल. या नवीन ट्रेनचे ऑपरेशन 16 जानेवारीपासून सुरू होईल, परंतु बुकिंग शनिवारपासूनच सुरू झाले आहे. दक्षिण मध्य रेल्वे (SCR) नुसार, विशाखापट्टणम-सिकंदराबाद […]
-
उत्तराखंडच्या मंत्र्याच्या सांगण्यावरून इस्रोने जोशीमठची छायाचित्रे वेबसाइटवरून हटवली, म्हणाले- भीती पसरवली…
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) उत्तराखंड सरकारचे मंत्री डॉ. धनसिंग रावत यांच्या आदेशानुसार जोशीमठ भूस्खलनाची उपग्रह प्रतिमा हटवण्यात आली आहेत. डॉ. रावत हे चमोली जिल्ह्याचे प्रभारी मंत्री असून, सध्या जोशीमठ येथे आहेत. मंत्री डॉ. धनसिंग रावत यांनी सांगितले की, जोशीमठ कोसळल्याबद्दल इस्रोचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आणि टीव्ही चॅनेलवर त्यासंबंधित बातम्या प्रसारित झाल्यानंतर […]
-
आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदींना कोरोनाची बाधा, प्रकृती बिघडल्याने ऑक्सिजन सपोर्ट
मुंबई : आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. लंडनमधील एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. स्वत: ललित मोदी यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करत माहिती दिली आहे. तसंच त्यांना पुढील उपचारासाठी लंडनला एअरलिफ्ट करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं असून त्याचेही फोटो पोस्ट […]
-
मनीष सिसोदियांच्या कार्यालयावर सीबीआय पुन्हा छापेमारी ? पण सीबीआयकडून स्पष्टीकरण
दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या कार्यालयावर सीबीआयने छापा टाकल्याचा आरोप केला आहे. शनिवारी संध्याकाळी 4 वाजता त्यांनी ट्विट केले की, “आज पुन्हा सीबीआय माझ्या कार्यालयात पोहोचली आहे. त्यांचे स्वागत आहे. त्यांनी माझ्या घरावर छापा टाकला, माझ्या कार्यालयावर छापा टाकला, माझ्या लॉकरची झडती घेतली, माझ्या गावातही तपास केला. माझ्याविरुद्ध काहीही मिळाले नाही. ते […]
-
राष्ट्रवादीच्या एका खासदाराचे सदस्यत्व रद्द, शरद पवारांना धक्का
नवी दिल्ली : लोकसभा सचिवालयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका खासदाराचे सदस्तत्व रद्द केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेतील सदस्य संख्या एकाने कमी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यासंदर्भातील अधिसूचनाही काढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना अपात्र ठरवले आहे. फैजल यांना न्यायालयाने हत्येचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणात दोषी […]









