पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाचा इम्रान खानला जामीन मंजूर

  • Written By: Published:
पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाचा इम्रान खानला जामीन मंजूर

लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने (ATC) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दोन प्रकरणांमध्ये 2 जूनपर्यंत जामीन मंजूर केला आहे. जिन्ना हाऊस तोडफोड प्रकरणात आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) कार्यकर्ते जिल्ले शाह हत्या प्रकरणात इम्रान खानला जामीन मिळाला आहे.

इम्रान खान यांनी त्यांचे वकील, बॅरिस्टर सलमान सफदर यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती आणि जिल्ले शाह खून प्रकरणात त्यांच्याविरुद्ध “निराधार खटला” दाखल करण्यात आला होता. साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान सूडाच्या राजकारणाचा बळी होता आणि राजकीय कारणांसाठी त्याला बाहेर काढले जात असल्याचे याचिकेत म्हटले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव इम्रान खानला जिल्ले शाह खून प्रकरणात अंतरिम जामीन मिळावा, असे याचिकेत म्हटले आहे.

Twitter : ‘ब्लू टिक’ असणाऱ्यांना मिळणार स्पेशल फिचर; एलॉन मस्क यांची मोठी घोषणा

पोलिस तपास अहवालानुसार, पीटीआय कार्यकर्ता झिल शाह लाहोरमध्ये रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना कारने धडक दिली. त्यांना तातडीने सर्व्हिसेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ले शाह यांची हत्या झाल्याचा दावा पीटीआय पक्षाने केला आहे. पक्षाने शवविच्छेदन अहवालाचा हवाला देत जिल्ले शाह यांचा प्रचंड छळ करण्यात आला.

9 मे रोजी अल-कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात इम्रान खानला अटक केल्यानंतर हिंसक निदर्शने झाली. त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिना हाऊस (लाहोर कॉर्प्स कमांडरचे घर), मियांवली एअरबेस आणि फैसलाबादमधील आयएसआय इमारतीसह डझनभर लष्करी प्रतिष्ठानांची तोडफोड केली.

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube