इराण अमेरिका युद्धाचा उडाला भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर

नव्या दरानुसार, डिझेलच्या किंमतीत 54.9% वाढ होऊन 520.35 पाकिस्तानी रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत.

News Photo   2026 04 03T201932.898

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य (War) परिस्थितीच्या झळा आजही शेजारील देशांना बसत आहेत. आखाती देशातील युद्धामुळे इंधन पुरठवठ्यावर मोठा परिणाम झाला असून काही राष्ट्रांमध्ये इंधन दरवाढ झाली आहे. पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका झाल्याचं दिसून येत आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलमध्ये अनुक्रमे 137 आणि 184 रुपयांची वाढ झाली आहे.

पाकिस्तानच्या सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ केली, विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानध्ये इंधनाची दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर, आता महिनाभरातच ही दुसरी दरवाढ झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. दरम्यान, भारताने मात्र या परिस्थितीतही कुठलीही दरवाढ न करण्यावर भर दिला आहे. मात्र, घरगुती गॅसच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली असून सध्यातरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कुठलीही वाढ झाली नाही.

पूल उद्ध्वस्त, क्षेपणास्त्र हल्ले आणि युद्धाचे सावट! इराण-अमेरिका संघर्ष धोकादायक टप्प्यात

आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्याची कमतरता आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे ही दरवाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानच्या शहबाज शरीफ सरकारने सर्वसामान्यांच्या खिशावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भार टाकला आहे. पाकिस्तानमध्ये गुरुवार मध्यरात्री म्हणजे शुक्रवारपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.

नव्या दरानुसार, डिझेलच्या किंमतीत 54.9% वाढ होऊन 520.35 पाकिस्तानी रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत. तर, पेट्रोलच्या किंमतीत 42.7% वाढ झाली असून पेट्रोल 458.40 रुपये (पाकिस्तानी चलन) प्रती लिटर पर्यंत पोहोचलं आहे. या नव्या दरानुसार पेट्रोलच्या किंमतीत 137.23 रुपये प्रति लीटर तर डिझेलच्या किंमतीत 184.49 पाकिस्तानी रुपये प्रति लीटर वाढ झाली आहे. त्यामुळे, पाकिस्तानी जनतेनं संताप व्यक्त केला असून पेट्रोल पंपावर पेट्रोल खरेदीसाठी रांगा लागल्याचं दिसून येत आहे.

follow us