Hamza Burhan : पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार ठार; दहशतवादी हमजा बुरहानची गोळ्या घालून हत्या

 Hamza Burhan : पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार असलेला दहशतवादी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली असल्याची

 Hamza Burhan

 Hamza Burhan : पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार असलेला दहशतवादी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. अज्ञात हल्लेखोराने गोळ्या झाडून त्याची हत्या केली. 2019 मध्ये काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी हमजा बुरहान हा एक होता.

माहितीनुसार, हमजा बुरहान (Hamza Burhan) स्वतःला शिक्षक म्हणून पाकिस्तानात (Paksitan) आश्रय घेऊन होता. माहितीनुसार, अर्जुमंद गुलजार दार उर्फ ​​हमजा बुरहान, हा ‘अल-बद्र’ या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा एक प्रमुख कमांडर होता. तो मूळचा जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील रत्नापोरा येथील रहिवासी होता. 2017 मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी तो पाकिस्तानला गेला होता मात्र त्यानंतर स्थानिक तरुणांची दहशतवादी संघटनांमध्ये भरती करणे, दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणे करण्यासाठी सक्रियपणे सहभागी झाला होता.

पुलवामा हल्ल्यात 40 हून अधिक सीआरपीएफ जवान शहीद

14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यात (Pulwama Attack) 40 हून अधिक सीआरपीएफ (CRPF) जवान शहीद झाले होते.या हल्ल्यात त्याने बजावलेल्या मुख्य भूमिकेमुळे भारत सरकारने 2022 मध्ये त्याला यूएपीए अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित केले होते. माहितीनुसार, हमजा न हा पुलवामा आणि दक्षिण काश्मीरमध्ये दहशत पसरवणे, तरुणांची दहशतवादी संघटनांमध्ये भरती करणे आणि दहशतवादासाठी आर्थिक रसद पुरवणे या कामांमध्ये सक्रिय भूमिका बजावत होता.

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंना अटक

14 फेब्रुवारी 2019 रोजी जैशच्या एका दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेली कार लेथपोरा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर धडकवली होती.  यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. या घटनेचा तपास करणाऱ्या ‘राष्ट्रीय तपास संस्थेने’ (NIA), पुलवामा हल्ला घडवून आणण्याच्या कटात सहभागी असलेल्या आणि दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवर रसद व आर्थिक मदत पुरवणाऱ्या प्रमुख व्यक्तींपैकी एक म्हणून हमजा बुरहान याची ओळख पटवली होती.

follow us