इराणच्या भूमीतून अमेरिकेने पायलटला वाचविले ! सुटकेची कथा हॉलिवूड चित्रपटासारखीच

US Pilot Rescue-तर एक पायलट इराणच्या भूमीवर अडकला होता. त्या पायलटला अमेरिकेने इराणच्या भूमीतून सुटका कशी केली ही हॉलिवूड चित्रपटासारखीच कथा आहे.

  • Written By: Published:
Pilot Rescue Operation America

US Pilot Rescue : अमेरिका-इस्रायल व इराण युद्धात (US Israel Iran) अमेरिकेने इराणमधील आपल्या पायलटला सुरक्षित बाहेर काढले आहे. अमेरिकेचे लष्करी एफ-15 विमान इराणने आपल्या भूमीत पाडले होते. विमानात दोन पायलट होते. त्यातील एक पायलट सुरक्षितपणे इराणच्या तावडीतून सुटला होता. तर एक पायलट इराणच्या भूमीवर अडकला होता. त्या पायलटला अमेरिकेने इराणच्या भूमीतून सुटका कशी केली ही हॉलिवूड चित्रपटासारखीच कथा आहे.

अमेरिकेचे विमान शुक्रवारी इराणने आपल्या भूमीत पाडले होते. विमानातील दोन्ही क्रू सदस्यांनी बाहेर उडी मारली होती. ते इराणी भूमीवर उतरले होते. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) या दोघांना पकडण्यासाठी प्रयत्न केले होते. यातील एक पायलट सुरक्षितपणे अमेरिकेने बाहेर काढला होता. एक पायलट मात्र इराणच्या भूमीवर अडकलेला होता. त्याच्या सुटकेसाठी अमेरिकेने जोरदार प्रयत्न सुरू केले होते. अमेरिकन सैन्याने आपली बचाव मोहीम सुरू करण्यापूर्वी सीआयएने प्रथम एक दिशाभूल करणारी मोहीम सुरू केलीय. रणनीतीचा एक भाग म्हणून, इराणमध्ये एक अफवा पसरविण्यात आलीय. अफवा अशी होती की अमेरिकन सैन्याने त्या अधिकाऱ्याला आधीच शोधून काढले आहे. त्याला जमिनीमार्गे देशाबाहेर नेण्यात आल्याची ती अफवा होती. त्याचबरोबर सीआयएने आपल्या विशेष क्षमतांचा वापर सुरू केला. वेपन सिस्टीम्स ऑफिसरचा म्हणजेच पायलटचा शोध घेतला.

पायलटचे अचूक ठिकाणही सीआयएने (CIA) शोधले होते. पायलट हा एका डोंगराच्या फटीमध्ये लपून बसला होता. तेथून अमेरिकेने आपल्या सैनाची सुटका केलीय. सीआयए व्यतिरिक्त इतर कोणालाही त्याचे ठिकाण शोधणे कठीण गेले असते. सीआयएने तात्काळ वैमानिकाचे अचूक ठिकाण पेंटागॉन, अमेरिकी सैन्य आणि व्हाईट हाऊसला कळवले. यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तात्काळ बचाव मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तब्बल बाराहून अधिक विमानाचा वापर करून पायलटची सुरक्षित सुटका करण्यात आली.


इतिहासातील सर्वात धाडसी शोध-डोनाल्ड ट्रम्प

इराणमधील पायलटची सुटका झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैनिकांची प्रशंसा केलीय. आम्ही त्याला वाचवले. त्याला जखमा झालेल्या आहेत. माझ्या प्रिय अमेरिकन नागरिकांनो, गेल्या काही तासांत, अमेरिकन सैन्याने आपल्या सर्वोत्तम क्रू सदस्यांपैकी एक असलेल्या, एका अत्यंत आदरणीय कर्नलला – परत मिळवण्यासाठी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात धाडसी शोध आणि बचाव मोहिमांपैकी एक यशस्वीरित्या पार पाडली असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय.

follow us