पाकिस्तान- अफगाणिस्तानमध्ये युद्ध सुरू; पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची घोषणा
Pakistan Afghanistan War : भारताच्या दोन्ही शेजारील राष्ट्र पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले आहे. दोन्ही देशांमध्ये सुरु असणारा
Pakistan Afghanistan War : भारताच्या दोन्ही शेजारील राष्ट्र पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले आहे. दोन्ही देशांमध्ये सुरु असणारा सीमा वादाचा रूपांतर आता लष्करी संघर्षात झाला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान युद्ध सुरु झाल्याची घोषणा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ (Khawaja Asif) यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तामधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला होता. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात गुरुवारी रात्री अफगाणिस्तानकडून प्रतिहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात माहितीनुसार, पाकिस्तानचे 55 सैनिकांचा मृत्यू झाला. तर अफगाणिस्तानने 15 हून अधिक पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.
तर आता पाकिस्तानने ऑपरेशन गझब-लिल-हक (Operation Gazab-Lil-Haq) सुरु केले आहे. या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानने अफगाणिस्तावर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरु केले आहे. या हल्ल्यात आतापर्यंत अफगाणिस्तानचे 130 सैनिक मारले गेले असल्याची माहिती समोर येत आहे.
ख्वाजा शरीफ यांनी युद्धाची घोषणा केली
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिले की त्यांचा देश आता लढेल. एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, आमच्या संयमाची मर्यादा ओलांडली आहे. आता उघड युद्ध आहे.
#Pakistan‘s Defence Minister #khawajaasif‘s Statement on #AfghanPakistanWar #Afghanistan #AfghanistanAndPakistan #Afghanen #PakAfghanBorder #PakAfghanConflict #PakAfghan #PakAfghanWar #KhyberPakhtunkhwa #DurandLine #Kabul #Islamabad #Taliban #PakistanAirForce #Afghans #Afghan pic.twitter.com/pb6m9zASQp
— Rajdeep Dutta (@Rajdeep43187523) February 27, 2026
सीमा वाद वाढल्यानंतर, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये (Pakistan Afghanistan War) मोठा संघर्ष सुरू झाला असून पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलसह कंधार आणि पक्तियामध्ये जोरदार हल्ले सुरू केले आहेत. या ऑपरेशनला ‘ऑपरेशन गझब-लिल-हक’ असे नाव देण्यात आले आहे.
पाकिस्तानने केला मोठा दावा
तर दुसरीकडे शुक्रवारी पहाटे केलेल्या कारवाईत 100 हून अधिक तालिबानी दहशतवादी मारल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. या हल्ल्यांमध्ये 133 दहशतवादी मारले गेले आणि 200 हून अधिक जखमी झाले, असे पाकिस्तानने म्हटले आहे. 80 हून अधिक टँक आणि चिलखती वाहने नष्ट केल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
पाकिस्तान- अफगाणिस्तानमध्ये युद्ध सुरू; पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची घोषणा
