व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्ट्स डिनर दरम्यान गोळीबार; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या वेळेनुसार, शनिवारी रात्री 8.45 वाजता, वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमधील ‘कॉरेस्पॉन्डंट्स डिनर’ कार्यक्रमादरम्यान गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स हे देखील उपस्थित होते.
घटनेची माहिती मिळताच, राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सनी तात्काळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना घटनास्थळावरून (White House Correspondents Dinner) सुखरूप बाहेर काढले आहे. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, सध्या तरी कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
सध्या समोर आलेल्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे डायनिंग टेबलवर बसले असताना हॉटेलमध्ये गोळीबाराचा आवाज सुरु झाला होता. हॉटेलमध्ये गोळीबार होताच सुरक्षा रक्षकांनी तात्काळ ट्रम्प यांना घटनास्थळावरून सुरक्षित स्थळी हलवले. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यामध्ये अनेक लोक टेबलांखाली लपताना दिसत आहेत.
Video of the scene inside the WHCD pic.twitter.com/tdxTWYVSeU
— Josh Rogin (@joshrogin) April 26, 2026
गोळीबारानंतर निर्माण झालेल्या गोंधळाच्या आणि अफरातफरीच्या वातावरणात, अनेक लोक घाबरून सैरावैरा पळतानाही दिसून आले. तर दुसरीकडे सुरक्षा दलांनी घटनास्थळीच एका संशयित हल्लेखोराला गोळ्या घालून ठार केले आहे. या घटनेकडे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेतील एक गंभीर त्रुटी म्हणून पाहिले जात आहे.
🚨 JUST IN: New video shows Secret Service JUMPING on President Trump following shots fired at the White House Correspondents Dinner
They then huddled 47 and got him out safely. pic.twitter.com/5ock4kigdq
— Nick Sortor (@nicksortor) April 26, 2026
लपून छपून भेटणार नाही; उद्धव ठाकरे भेटीवर मुख्यमंत्री फडणवीस थेट बोलले-
यापूर्वीही ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्याचे प्रयत्न झाले आहेत. त्यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेदरम्यानही त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.