ब्रेकिंग: भाजप खासदार रामराव वडकुते यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; दिल्लीतील एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास

BJP MP Ramrao Wadkute Passes Away: हिंगोली आणि परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन झाले.

BJP MP Ramrao Wadkute Passes Away

BJP MP Ramrao Wadkute Passes Away: हिंगोली आणि परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन झाले आहे. आज पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची राजकीय इनिंग सुरू?, भाजपच्या राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणीत मोठी जबाबदारी

रामराव वडकुते यांनी हिंगोली जिल्ह्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्ष संघटनेची बांधणी मजबूत झाली. पक्ष संघटनेतील त्यांच्या कामाची दखल घेत भाजपने त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून संधी दिली होती.

दरम्यान, वडकुते यांचे पार्थिव आज दिल्लीहून परभणी येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती वडकुते कुटुंबीयांनी दिली आहे.

पुण्यात 100 विद्यार्थ्यांना मोफत MBA करण्याची संधी! ऑलकार्गो समूहाची 15 कोटींची गुंतवणूक; लॉजिस्टिक्स स्कूलची स्थापना

follow us