देशावर दुहेरी हवामान संकट; पुढील 96 तास मुसळधार पाऊस महाराष्ट्रासह अनेक राज्यांत फ्लॅश फ्लडचा इशारा

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे तीव्र क्षेत्र अर्थात दीप डिप्रेशन ओडिशा किनारपट्टी ओलांडून अंतर्गत भागाकडे सरकत आहे.

  • Written By: Published:
Untitled Design   2026 07 30T191730.875

Flash flood warning for Maharashtra and several other states : देशातील हवामान परिस्तिथीत मोठे बदल होत असून पुढील 72 ते 96 तास अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या दोन शक्तिशाली हवामान यंत्रणा एकाच वेळी सक्रिय झाल्याने मान्सूनला मोठी ताकद मिळाली आहे. त्यामुळे उत्तर, मध्य आणि काही दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, अचानक पूर, सखल भागांत पाणी साचणे आणि डोंगराळ भागांत दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी विनाकारण प्रवास टाळावा तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे तीव्र क्षेत्र अर्थात दीप डिप्रेशन ओडिशा किनारपट्टी ओलांडून अंतर्गत भागाकडे सरकत आहे. ही हवामान यंत्रणा समुद्रातून मोठ्या प्रमाणात दमात हवा आणि बाष्प घेऊन मध्य भारतात प्रवेश करत आहे. त्यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आसपासच्या भागांमध्ये ढगांची घनता वाढली असून पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड आणि आसपासच्या भागांमध्ये ढगांची घनता वाढली असून पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

दुसरीकडे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या दिशेने वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजेच झंझावात सक्रिय झाला आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या या हवामान यंत्रणेचा प्रभाव हिमालयीन भागात वाढत असून वातावरणात मोठे बदल घडत आहेत. या दोन्ही यंत्रणांचा परस्परसंवाद होत असल्याने वातावरणातील अस्थिरता झपाट्याने वाढत आहे. मध्य भारतातून येणारी दमट हवा आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह एकमेकांवर आढळल्यास ढगांची जलद निर्मिती होते आणि पाऊस अचानक तीव्र स्वरूप धारण करतो. यामुळे पुढील काही दिवसांत अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम शिंदेंच्या भेटीगाठी; राजकीय चर्चांना उधाण

काही ठिकाणी ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा देखील हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. सध्याच्या अंदाजानुसार मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या काही भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर पंजाब, हरियाणा, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या आणि सखल भागांमध्ये पाणी साचणे, नद्यांच्या पातळीत वाढ होणे आणि अचानक पूर येण्याचा धोका कायम राहणार आहे.

हवामान शास्त्रज्ञांच्या मते, दमट मान्सून वारे आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स यांचा संगम झाल्यास वातावरणात मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस, ढगफुटीसारख्या घटना आणि सलग अनेक तास किंवा दिवस पाऊस सुरू राहण्याची शक्यता वाढते. याचा परिणाम म्हणून शहरी भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी, रेल्वे आणि विमानसेवा विस्कळीत होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

सिस्पे घोटाळ्यातील मुख्य आरोपी राहुल काळोखेला इंटरपोलमार्फत फिजीमध्ये अटक; पीडितांच्या न्यायाच्या लढ्याला बळ

डोंगराळ राज्यांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका वाढला असून हिमालयीन भागात विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुराचा धोका असलेल्या भागांतील नागरिकांनी नदी-नाल्यांपासून दूर राहावे, तर डोंगराळ उतारांवर राहणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांनुसार आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान तज्ज्ञ सध्या या दोन्ही हवामान यंत्रणांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

त्यांच्या मार्गात किंवा वेगात किंचित बदल झाला तरी पावसाची तीव्रता आणि परिणामक्षेत्र बदलू शकते. मात्र, सध्याच्या परिस्थितीनुसार पुढील आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता असून अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू राहू शकतो. त्यामुळे एका बाजूला पाण्याची गरज असलेल्या भागांना दिलासा मिळण्याची शक्यता असली तरी दुसऱ्या बाजूला अतिवृष्टी, पूर आणि दरडी कोसळण्यासारख्या नैसर्गिक संकटांचा धोका वाढला आहे.

follow us