संविधान म्हणजे फसवणूक, ढोंग आणि थट्टा; भारतात मूठभर बदमाशच खरे शासक, माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांची वादग्रस्त टीका!

Markandey Katju Indian Constitution Statement: माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी भारतीय संविधानाला फसवणूक आणि ढोंग म्हटले आहे.

Markandey Katju Indian Constitution Statement

Markandey Katju Indian Constitution Statement: सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी भारतीय संविधानाबाबत केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय संविधानाला त्यांनी फसवणूक, ढोंग आणि थट्टा असे संबोधले आहे. संविधानात लोकशाही, सार्वभौमत्व आणि जनतेच्या अधिकारांची चर्चा केली जाते; मात्र प्रत्यक्षात देशातील सत्ता मूठभर लोकांच्या हातात असल्याचा दावा त्यांनी केला. इतकेच नव्हे, तर संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रण मिळूनही आपण कधीच उपस्थित राहत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पुण्यात पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात तुफान राडा! ठाकरे गटाच्या नेत्या रेखा कोंडेंना मारहाण; आरती मारणे यांच्यावर गंभीर आरोप

मी संविधान दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत नाहीत

मार्कंडेय काटजू यांनी आपल्या लेखातून ही भूमिका मांडली आहे. दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. यानिमित्त सर्वोच्च न्यायालयात आयोजित कार्यक्रमासाठी भारताच्या सरन्यायाधीशांकडून त्यांना निमंत्रण दिले जाते. या कार्यक्रमाला राष्ट्रपती, सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, केंद्रीय कायदामंत्री आणि ॲटर्नी जनरल यांसारखे मान्यवर उपस्थित असतात. मात्र, भारतीय संविधानाबाबतची आपली भूमिका लक्षात घेता आपण या कार्यक्रमांना कधीही हजेरी लावत नसल्याचे काटजू यांनी सांगितले.

‘मूठभर बदमाश हेच देशाचे खरे शासक’

संविधानाच्या प्रस्तावनेत ‘आम्ही भारताचे लोक’, ‘लोकशाही’ आणि ‘सार्वभौम’ यांसारख्या शब्दांचा उल्लेख आहे. यातून देशाची जनता सर्वोच्च असल्याचे चित्र उभे केले जाते. मात्र, प्रत्यक्षात मूठभर बदमाशच देशाचे खरे शासक असल्याची टीका काटजू यांनी केली आहे. संविधानाने नागरिकांना मूलभूत अधिकार दिले असले, तरी देशातील गरिबी, बेरोजगारी आणि भुकेचा प्रश्न अधिक गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तीसाठी भाषणस्वातंत्र्य आणि इतर मूलभूत अधिकारांचा काय उपयोग, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

जिममध्ये जाणाऱ्या तरुणांनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्सच्या विक्रीवर FDA ची करडी नजर; तुकाराम मुंढेंचा कडक इशारा

‘जमिनीवर अंमलबजावणी नसेल तर संविधान केवळ कागदाचा तुकडा’

संविधानातील तरतुदींची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे. अन्यथा संविधान केवळ कागदावरच राहते, असे काटजू यांनी म्हटले आहे. भारताला संविधानात धर्मनिरपेक्ष देश म्हटले असले, तरी प्रत्यक्षात अल्पसंख्याकांना मिळणारी वागणूक वेगळे चित्र दाखवते, असा दावाही त्यांनी केला. भारतीय संविधानाची अक्षरशः मोडतोड झाली असून ते आता केवळ पोकळ कवच बनून राहिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नवीन भारतीय संविधानाचा मसुदा तयार केल्याचा दावा

मार्कंडेय काटजू यांनी आणखी एक महत्त्वाचा दावा केला आहे. 1950 मध्ये लागू झालेल्या भारतीय संविधानाची जागा घेण्यासाठी आपण नवीन संविधानाचा मसुदा तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या काळानुसार आणि परिस्थितीनुसार देशाला नव्या संविधानाची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या नव्या मसुद्याचा देशातील जनतेने विचार करावा आणि योग्य वाटल्यास तो स्वीकारावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मुंबई-ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना बढतीचा ‘डबल धमाका’; दुबेरे आणि देवेन भारती महासंचालक श्रेणीत

follow us