देशातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर; लाखो विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय करिअरचा निर्णायक टप्पा पार

लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली, राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थातच एनटीएने नीट युजी 2026 परीक्षेचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (41)

NEET UG exam results declared : देशभरातील वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थातच एनटीएने नीट युजी 2026 परीक्षेचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया आणि समुपदेशन वेळेत पार पडावे, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष कोणत्याही विलंबाशिवाय सुरू व्हावे यासाठी एनटीएने नियोजित वेळेत निकाल जाहीर केला आहे.

यंदाची नीट युजी परीक्षा 21 जून 2026 रोजी देशातील 551 शहरांमध्ये आणि परदेशातील 14 शहरांमध्ये घेण्यात आली होती. देशभरातील 5,440 परीक्षा केंद्रानवार ही परीक्षा पार पडली. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी सुमारे 20 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेला हजेरी लावली होती. निकालानुसार, 11 लाख 21 हजार विद्यार्थ्यांनी पात्रता मिळवली असून ते आता एमबीबीएस, बीडीएस, आयुष्य आणि इतर वैद्यकीय आणि आरोग्यविषयक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे गुणपत्रक आणि निकाल एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

यंदाच्या निकालात मुलींची कामगिरी विशेष लक्षवेधी ठरली आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये 58 टक्क्यांहून अधिक मुलींचा समावेश आहे. मुलींचा उत्तीर्णतेचा दर देखील मुलांच्या तुलनेत अधिक नोंदवला गेला आहे. परीक्षेला बसलेल्या मुलींपैकी 56.8 टक्के मुलींनी पात्रता मिळवली असून मुलांमध्ये हा दर 55.1 टक्के आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मुलींची वाढती उपस्थिती आणि यश पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 17 ते 19 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

पुण्यात कंत्राटदाराच्या आत्महत्येनंतर खळबळ; माजी आमदार रवींद्र धंगेकरांसह 14 जणांविरोधात गुन्हा

देशातील गुणवत्तेच्या यादीत पंजाबच्या आर्यन गुप्ता आणि हरियाणाच्या पानशुल बन्सल यांनी संयुक्तपणे अव्वल स्थान मिळवले आहे. दोघांनीही 720 पैकी 715 गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला. यंदाच्या गुणवंत विद्यार्थ्यांची यादी पाहिली असता, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू आणि तेलंगणा या आठ राज्यांमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 705 पेक्षा अधिक गुण मिळवणारे 17 विद्यार्थी देशातील विविध भागांतून समोर आले आहेत.

याशिवाय, 690 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या 138 विद्यार्थ्यांनीही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. हे विद्यार्थी देशातील 66 शहरांमध्ये विखुरलेले असून त्यापैकी तब्बल 93 टक्के विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. त्यामुळे सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन आणि स्पर्धात्मक परीक्षेची तयारी यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

आता नीट यूजी 2026 चा निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेश आणि समुपदेशन प्रक्रियेला वेग येणार आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरवणाऱ्या या निकालामुळे पुढील काही दिवसांत एमबीबीएस, बीडीएस आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेकडे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागून राहणार आहे.

नीट परीक्षा निकाल लिंक:
https://examinationservices.nic.in/ResultoService26/Ntnt/Login
https://cnr.nic.in/ResultDir/Ntnt/Login

follow us