महाराजांच्या सह्याद्रीचं वाळवंट करायचंय का? भीमाशंकर प्रकल्पावरून सयाजी शिंदेंचा फडवीसांना सवाल
Sayaji Shinde questions Fadnavis over Bhimashankar project सयाजी शिंदेंनी या वृक्षतोडीवरून आक्रमक होतं थेट मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे.
Sayaji Shinde questions Fadnavis over Bhimashankar project : कर्जत-भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून महाराष्ट्रात राजकीय आणि पर्यावरणीय वाद पेटला आहे. या प्रकल्पासाठी लाखो झाडांची कत्तल होणार असल्याचा आरोप होत असताना, आता पर्यावरणासाठी काम करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील या वृक्षतोडीवरून आक्रमक होतं थेट मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे.
मराठी रंगभूमीवर OTT च्या धाटणीचा अनोखा प्रयोग; तीन कथांतून उलगडणार ‘ति ची गोष्ट’!
भीमाशंकर प्रकल्पावरून सयाजी शिंदेंचा फडवीसांना सवाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सयाजी शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, एका बाजूला प्रकल्पातून मिळणारा आर्थिक फायदा आणि दुसऱ्या बाजूला जंगल, पाणी, प्राणी-पक्षी यांचे होणारे नुकसान, या दोन्हींचा विचार होणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडल्या गेलेल्या सह्याद्रीच्या परिसरात अनेक प्रकल्प उभारले गेले, तर या भागाच्या पर्यावरणाचे काय होईल, असा सवाल त्यांनी केला.सह्याद्रीतील नैसर्गिक संपत्ती नष्ट होऊ नये, यासाठी सरकारने वेळीच पावले उचलावीत, असे आवाहनही त्यांनी केले.
विकासकामांना विरोध करण्यापेक्षा पर्यावरणाचे नुकसान टाळून प्रकल्प कसे राबवता येतील, याचा विचार झाला पाहिजे, अशी भूमिका सयाजी शिंदे यांनी मांडली. मुख्यमंत्री, वनमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. जंगलातील झाडे तोडण्यासंदर्भातील नियम आणि कायद्यांचा फेरविचार करावा. वन्यजीव, पक्षी, जलस्रोत आणि झाडांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक बदल करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच महाराष्ट्रातील नागरिकांनीही पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले.