मोठी बातमी! पवार गटाचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, NDA च्या बाजूने मत देणार!

Sharad Pawar NCP Supports Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळेंनंतर आता जितेंद्र आव्हाडांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 27T181948.210

Sharad Pawar NCP Supports Delimitation Bill : देशात सध्या डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून भूमिका मांडल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशनच्या माध्यमातून लोकसभेच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ होणार असेल, तर आपल्या पक्षाचा या विधेयकाला पाठिंबा असेल, असे वक्तव्य केले होते. तसेच या मुद्द्यावर इंडिया आघाडीतील घटक पक्षांशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, आता सुप्रिया सुळे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन ही अनिवार्य प्रक्रिया असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या भूमिकेचा संदर्भ देत जितेंद्र आव्हाड यांनी डिलिमिटेशनला पक्षाचा पाठिंबा असण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे डिलिमिटेशन विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us