झुमका पटोला’ने मला नृत्यावरील माझं प्रेम अशा पद्धतीने व्यक्त करण्याची संधी दिली, जशी याआधी कधीच मिळाली नव्हती – शर्वरी

सूरज आर. बडजात्या यांच्या आगामी ‘ये प्रेम मोल लिया’ या चित्रपटातील या गाण्यामुळे शर्वरीला अशा दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 16T182427.135

Sharvari has often captured the audience’s attention : शर्वरीने आपल्या डान्स परफॉर्मन्समधून अनेकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचं नवं गाणं ‘झुमका पटोला’ प्रेक्षकांना तिच्या नृत्यकौशल्याची आणखी एक झलक दाखवतं. सूरज आर. बडजात्या यांच्या आगामी ‘ये प्रेम मोल लिया’ या चित्रपटातील या गाण्यामुळे शर्वरीला अशा दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे, ज्यांची गाणी हिंदी चित्रपटसृष्टीचा आणि अनेक अविस्मरणीय ऑन-स्क्रीन क्षणांचा अविभाज्य भाग राहिली आहेत. शर्वरीच्या मते, सूरज बडजात्या यांचा दृष्टिकोन केवळ कोरिओग्राफीपुरता मर्यादित नाही. गाण्यातील प्रत्येक हालचाल आणि हावभाव कथेशी घट्ट जोडलेला असतो.

ती म्हणते, “मला नेहमीच नृत्याची आवड होती; पण सूरज सरांसोबत काम करताना गाणं कथेमध्ये इतकं गुंफलेलं असतं की त्याकडे केवळ डान्स परफॉर्मन्स म्हणून पाहता येत नाही. ‘झुमका पटोला’*च्या शूटिंगदरम्यान ते मला समजावून सांगायचे की तो क्षण माझ्या व्यक्तिरेखेसाठी नेमका काय अर्थ घेऊन येतो. त्यांनी यापूर्वी केलेल्या गाण्यांशी संबंधित किस्सेही ते सांगायचे. प्रत्येक स्टेप आणि हावभावातून ते व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला.

सोन्याचा मुलामा, जबरदस्त आवाज अन् लाखोंची किंमत, सोनीने सादर केले नवे म्युझिक प्लेअर

नृत्याची स्वतःची एक भाषा असते आणि कधीकधी एखादं गाणं ते सांगून जातं, जे एखाद्या दृश्यातून व्यक्त करणं शक्य होत नाही. काही गाणी वर्षानुवर्षं आपल्या मनात का टिकून राहतात, यामागे एक कारण आहे. आपण लक्षात ठेवलेल्या व्यक्तिरेखा आणि क्षणांशी ती गाणी इतकी जोडली जातात की त्यांना एकमेकांपासून वेगळं करता येत नाही. ‘झुमका पटोला’ने मला नृत्यावरील माझं प्रेम अशा पद्धतीने अनुभवण्याची संधी दिली, जशी याआधी कधीच मिळाली नव्हती. ‘ये प्रेम मोल लिया’ या टायटल ट्रॅकला मिळालेल्या प्रेमळ प्रतिसादानंतर आता प्रेक्षकांना हे गाणं अनुभवताना पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”

हिमेश रेशमिया यांचं संगीत असलेला ‘ये प्रेम मोल लिया’ हा चित्रपट आयुष्मान खुराना आणि शर्वरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला असून, 27 नोव्हेंबर 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

follow us