Jio Offers : महागाईत दिलासा ; Jio देणार एका रिचार्जवर दुसरा फ्री फ्री …

Jio Offers : देशात वाढत असणाऱ्या महागाईत अनेकांचे बजेट बिघडले आहे. यातच जिओने एक त्यांच्या ग्राहकांना दिलासादायक बातमी दिली आहे.

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Jio Offers

Jio Offers : देशात वाढत असणाऱ्या महागाईत अनेकांचे बजेट बिघडले आहे. यातच जिओने त्यांच्या ग्राहकांना दिलासादायक बातमी दिली आहे. जिओ आपल्या काही निवडक ग्राहकांना एका रिचार्जवर दुसरा फ्री देत आहे. ‘बाय वन गेट वन’ (Buy One Get One) ऑफर अंतर्गत रिचार्जसोबत एक रिचार्ज मोफत मिळणार आहे. या ऑफरअंतर्गत, जे यूजर्स 299 रुपये किंवा 349 रुपयांच्या प्लॅनसह रिचार्ज करतात, त्यांना अतिरिक्त एक महिन्याची सेवा मोफत मिळू शकते.

या ऑफरसाठी कोण पात्र?

माहितीनुसार, जिओची ही ऑफर फक्त काही निवडक ग्रााहकांसाठीच उपलब्ध आहे. जर तुमच्या मोबाईल नंबरवर कंपनीकडून ‘बाय वन गेट वन’ ऑफरबाबत मेसेज आला असेल तर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकतात. सोशल मीडियावर यूजर्संनी याबद्दल माहिती शेअर केल्यानंतर ही ऑफर चर्चेत आली. तर दुसरीकडे केवळ 299 रुपये किंवा 349 रुपयांचा प्लॅन निवडल्याने तुम्हाला ही ऑफर मिळेलच, याची खात्री नाही. एका वापरकर्त्याने एक्सवर याबद्दल माहिती दिल्यानंतर ही बाब समोर आली. त्यानंतर, ‘जिओ केअर’ (Jio Care) कडून आलेल्या प्रतिसादात स्पष्ट करण्यात आले की, ही ऑफर केवळ निवडक ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे.

रिचार्ज ‘मायजिओ’ (MyJio) ॲपद्वारेच करणे आवश्यक

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर जिओकडून आलेला मेसेज तपासा. जर त्यात ‘बाय वन गेट वन’ ऑफरचा उल्लेख असेल, तर मेसेजमध्ये नमूद केलेल्या विशिष्ट प्लॅनच्या किमतीकडे लक्ष द्या. त्यानंतर, ‘मायजिओ’ (MyJio) ॲप उघडा आणि त्याच प्लॅनचा वापर करून रिचार्ज पूर्ण करा. ही ऑफर मिळवण्यासाठी तुम्हाला ‘मायजिओ’ ॲपचाच वापर करणे आवश्यक आहे. जिओच्या या ऑफरमध्ये, तुम्ही रिचार्ज केल्यावर तुमचा पेड प्लॅन सक्रिय होईल. जेव्हा त्या प्लॅनची ​​वैधता संपेल, तेव्हा कंपनीकडून मिळालेला एक महिन्याचा मोफत प्लॅन आपोआप सक्रिय होईल.

जिओच्या 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय मिळते?

जिओचा 349 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात ग्राहकांना दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये ‘कॅनव्हा प्रो’ (Canva Pro) चे 12 महिन्यांचे सबस्क्रिप्शन आणि ‘गुगल जेमिनी प्रो एआय’ (Google Gemini Pro AI) प्लॅनचा 18 महिन्यांसाठी ॲक्सेस मिळतो. तसेच, ग्राहकांना ‘जिओ टीव्ही’ (JioTV) आणि ‘जिओ क्लाउड’ (JioCloud) चा मोफत ॲक्सेसही मिळतो.

उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी; पण ‘या’ अटींचं पालन करावं लागणार-

299 रुपयांच्या प्लॅन

जिओचा 299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात दररोज 1.5 जीबी हाय-स्पीड डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळते. यासोबतच, ग्राहकांना ‘जिओ टीव्ही’ आणि ‘जिओ क्लाउड’चा ॲक्सेस मिळतो. या प्लॅनमध्ये ‘गुगल जेमिनी प्रो’चा 18 महिन्यांसाठी मोफत ॲक्सेसही समाविष्ट आहे.

follow us