महाराष्ट्रातील लहान शेतक-यांना बाजारपेठेशी जोडणे

महाराष्ट्रातील लहान शेतक-यांना बाजारपेठेशी जोडणे

LetsUpp | Govt.Schemes

गरिबी निर्मुलनासाठी (Poverty alleviation)जपानचा निधी (JFPR) सहाय्यित राज्यातील (Maharashtra)लहान फळे व भाजीपाला उत्पादक शेतक-यांना (Farmers) शेतमाल विक्रीचे अधिकाधिक पर्याय उपलब्ध करुन देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी या योजनेचा लाभ दिला जातो.

खारघर दुर्घटनेची चौकशी करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; अंबादास दानवेंचं राज्यपालांना पत्र

योजनेच्या प्रमुख अटी :
महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये एकुण 14 ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात येतो. ही चौदा ठिकाणे नाशिक व औरंगाबाद-अमरावती या दोन मुल्यसाखळ्यांमध्ये विभागली आहेत. या साखळ्यांतील 14 ठिकाणी फळे व भाजीपाला उत्पादकांच्या एकूण 18 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या असून फक्त 18 शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी हा प्रकल्प राबविण्यात येतो.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे : आशियाई विकास बॅंकेच्या मान्यतेने वेळोवेळी निश्चित करण्यात येणा-या मार्गदर्शक सुचीनुसार कागदपत्रे सादर करावी.

लाभाचे स्वरूप असे :
• काढणी पश्चात हाताळणी, मुल्यवृध्दी, विक्री व्यवस्थापन इ.चे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांना प्रशिक्षण.
• शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी प्रक्षेत्र भेटी.
• शेतकरी-खरेदीदार थेट संबंध स्थापित करण्यासाठी विशेष परिसंवाद.
• शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी “फिरता निधी”.
• शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत उभारण्यात येणा-या प्राथमिक प्रक्रीया सुविधांसाठी अर्थसहाय्य.

या ठिकाणी संपर्क साधावा :
प्रकल्प संचालक, निधी व्यवस्थापन कक्ष,
जेएफपीआर प्रकल्प,F/E/78, LDB बिल्डींग, गुलटेकडी, मार्केटयार्ड, पुणे-37.
दुरध्वनी क्र.-020-2426 0574/5. ई-मेल – giujfpr@msamb.com.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube