वाहन चालक प्रशिक्षण योजना (विजाभज, इमाव व विमाप्र)
LetsUpp। Govt. Schemes
विजाभज इमाव व विमाप्र बेरोजगार (self-employment)युवक-युवतींना प्रशिक्षणाद्वारे स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक व सामाजिक स्थिरता मिळवून देणे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही योजना राबविली जात आहे.
‘सूत्रधार शोधता येतो पण सरकारची इच्छाशक्ती पाहिजे’, अजित पवारांचा हल्लाबोल
योजनेच्या प्रमुख अटी :
– उमेदवार विजाभज /इमाव व विमाप्र प्रवर्गाचा असावा.
– उमेदवार हा वाहन प्रशिक्षणासाठी मोटार परिवहन अधिनियमातील तरतुदीनुसार वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता शारीरिक पात्रता, आदी बाबींची पूर्तता करणारा आसावा.
– प्रशिक्षण कालावधीमध्ये जिल्हा कार्यालय ते प्रशिक्षण केंद्रापर्यंत जाणे येण्याचे भाडे, आरोग्य तपासणी, छायाचित्र, चालकाचा कच्चा व पक्का परवाना, वाहक परवाना व बिल्ला, राहण्याची व जेवण्याची व्यवस्था आदी संबंधित प्रशिक्षण संस्थेमार्फत केली जाते.
आवश्यक कागदपत्रे :
– उमेदवाराचा रहिवासी दाखला
– जातीचा दाखला
– उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार)
– रेशन कार्ड प्रत / लाईट बिल
– आधार कार्ड आदी.
लाभाचे स्वरुप :
– हलके मोटार वाहन चालक प्रशिक्षण, प्रशिक्षण कालावधी – ४० दिवस, मंजूर दर रु.३५२०/-
– अवजड मोटार वाहन चालक प्रशिक्षण , प्रशिक्षण कालावधी – ४० दिवस , मंजूर दर रु.४१००/-
– प्रशिक्षणाचा प्रकार – वाहक (कंडक्टर) प्रशिक्षण , प्रशिक्षण कालावधी – ८ दिवस , मंजूर दर रु.१६४५/-
– प्रशिक्षण कालावधी प्रशिक्षण केंद्राच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहणारे स्थानिक प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण केंद्राच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहणारे स्थानिक प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात राहत नसल्यास मोटार वाहन चालक प्रशिक्षणार्थी रु.३००/- वाहक प्रशिक्षणार्थीस रु.१५०/- प्रशिक्षण काळात विद्यावेतन दिले जाते.
अर्ज करण्याचे ठिकाण : संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय