सणासुदीच्या काळात पुण्या-मुंबईतील सोसायट्यांमध्ये महिलांची ‘गुलाबी गँग’…; नेमका प्रकार काय?
Festival Season & Pink Dress Women हातात मोबाईल, ठरलेल्या वेळेत एका घरातून दुसऱ्या घरात जाण्याची लगबग आणि झटपट...
Festival Season & Pink Dress Women What They Do : मुंबई-पुण्यातील लहान सोसायट्यांपासून ते मोठमोठ्या हाउसिंग सोसायट्यांपर्यंत सध्या गुलाबी रंगाचा टी-शर्ट घातलेल्या महिलांची वर्दळ वाढल्याचे दिसून येत आहे. हातात मोबाईल, ठरलेल्या वेळेत एका घरातून दुसऱ्या घरात जाण्याची लगबग आणि झटपट घरकाम उरकण्याची तयारी… हे चित्र आता अनेक शहरी भागांमध्ये परिचयाचं होत आहे. या महिला केवळ घरकामासाठी येत नाहीत, तर अॅपवर बुकिंग केल्यानंतर काही मिनिटांत मदत उपलब्ध करून देणाऱ्या नव्या व्यवसायव्यवस्थेचा भाग आहेत. नेमका हा प्रकार काय? गुलाबी टी-शर्टमध्ये येणाऱ्या महिला कोणत्या कंपनीच्या आणि त्या नेमकं कसं काम करतात? त्याबद्दल जाणून घेऊया…
महिलांना पाहताच पक्षी लवकर उडून जातात; पुरुषांना मात्र जवळ येऊ देतात, असं का? वैज्ञानिकही चक्रावले…
काही वर्षांपूर्वीपर्यंत घरकामासाठी मदतनीस शोधायची असेल, तर शेजाऱ्यांकडे चौकशी, ओळखीच्या व्यक्तींची मदत किंवा कामाला येणाऱ्या महिलेची वाट पाहणं, हेच पर्याय होते. पण आता घर झाडणं-पुसणं, भांडी घासणं किंवा कपडे धुण्यासारख्या कामांसाठीही मोबाईलवरून मदत मागवता येते. या बदलत्या बाजारात सध्या Snabbit आणि Urban Company च्या InstaHelp या दोन सेवांची विशेष चर्चा आहे. दोन्ही कंपन्या घरकामासाठी मदत उपलब्ध करून देत असल्या, तरी त्यांची पार्श्वभूमी, सेवा देण्याची पद्धत आणि व्यवसायाचा आवाका यात काही फरक आहेत.
Snabbit तीन मित्रांची कल्पना, घरकामासाठी एका क्लिकवर मदत
Snabbit ही झटपट घरकामासाठी मदत उपलब्ध करून देणारी स्टार्टअप कंपनी आहे. ज्याची सुरूवात 2024 मध्ये सुरू झाली. उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या संस्थापकांनी यापूर्वी Zepto मध्ये काम केलं होतं. घरगुती कामांसाठी प्लंबर किंवा इतर सेवा पुरवणारे लोक शोधताना होणारा त्रास, तासंतास वाट पाहावी लागणं आणि वेळेवर मदत न मिळणं, या समस्यांमधून घरकामासाठी मागणीनुसार मदत उपलब्ध करून देण्याची कल्पना पुढे आली. त्यानंतर कंपनीने घरकामासाठी मदतनीस शोधण्याची प्रक्रिया अॅपच्या माध्यमातून सोपी करण्यावर भर दिला. तर, दुसरीकडे Urban Company ही घरगुती सेवा क्षेत्रातील आधीपासूनची मोठी कंपनी आहे. ब्युटी सर्व्हिसेस, सलून, दुरुस्ती आणि घराच्या स्वच्छतेसारख्या सेवांबरोबरच कंपनीने InstaHelp या माध्यमातून तातडीने घरकामासाठी मदत देण्याच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. पण, Snabbit चं वैशिष्ट्य म्हणजे गरज पडेल तेव्हा काही मिनिटांत भांडी घासणं, झाडू-पोछा, कपडे घडी करणं किंवा स्वयंपाकघराची साफसफाई यांसारख्या रोजच्या कामांसाठी मदतनीस बुक करता येते.
Snabbit विरुद्ध Urban Company दर अन् वेटिंग टाइममध्ये पुढे कोण ?
Snabbit आणि Urban Company या दोन्ही कंपन्यांची तुलना करताना केवळ जाहिरातीतील दर किंवा ग्राहकांकडे पोहोचण्याच्या वेळेकडे पाहून निर्णय घेणं योग्य ठरणार नाही. कारण, शहर, परिसर, मागणी, बुकिंगची वेळ आणि उपलब्ध कामगार यांनुसार अनुभव बदलू शकतो.

टीप: नेमक्या सेवा, बुकिंगची वेळ आणि अंतिम दर परिसरानुसार बदलू शकतात. त्यामुळे बुकिंगपूर्वी दोन्ही अॅपवर उपलब्ध पर्याय एकदा अवश्य तपासावे.
Snabbit आणि Urban Company या दोन्ही सेवांचा विचार करताना एकच कंपनी सर्वांसाठी सर्वोत्तम आहे, असं ठामपणे सांगता येणार नाही. तुमच्या परिसरात कोणती सेवा उपलब्ध आहे, किती वेळात मदत मिळते, अंतिम दर किती आहे आणि कामाच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांचा अनुभव कसा आहे, या गोष्टी अधिक महत्त्वाच्या ठरतात. पण, बाजारात येणाऱ्या विविध कंपन्यांमुळे घरकामासाठी मदत शोधण्याची पद्धत बदलत आहे. पूर्वी ओळखीच्या मदतनीसावर किंवा ठरलेल्या वेळेवर अवलंबून राहावं लागायचं पण, आता ग्राहकांकडे अॅपवरून मदत मागवण्याचाही पर्याय आला आहे. या नव्या बाजारात ग्राहकांचा विश्वास, वेळेवर सेवा आणि परवडणारा दर कोणती कंपनी अधिक प्रभावीपणे टिकवते, यावरच Snabbit आणि Urban Companyमधील पुढची स्पर्धा ठरणार आहे.