Government Schemes : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकूल) योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

Government Schemes : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकूल) योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

Government Schemes : अनेकदा भटक्या आणि विमुक्त जमातीचे लोक लाभासाठी पात्र असून देखील, योजनांपासून वंचित राहतात. अशा योजनांसाठी मंजूर निधी अखर्चित राहतो. त्यामुळे अशा जमातीच्या लोकांना या योजनेसंबंधित माहिती मिळावी हाच आमचा प्रयत्न आहे. राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकूल) योजना (Yashwantrao Chavan Mukta Vasahat Gharkool Scheme)समाज कल्याण विभागामार्फत (Department of Social Welfare)राबवली जाते. या योजनेचा लाभ मुख्यतः भटक्या विमुक्त जाती जमातीच्या कुटुंबांना देण्यात येतो. या योजनेंतर्गत निवड झालेल्या विमुक्त आणि भटक्या जमातीच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच गुंठे जमीन देऊन त्यांना 269 चौरस फूटाचे घर बांधून दिले जाते.

लोकसभेपूर्वी येणार दोन महत्त्वाचे कायदे; अजितदादांनी दिले सूतोवाच

योजनेचे उद्दिष्ट्य काय?
– भटक्या जमातीचा विकास करणे.
– राज्यातील भटक्या जमातीचे राहणीमान उंचावणे
– भटक्या जमातींना विकासाच्या प्रवाहात आणणे.
– भटक्या जमाती जीवनात स्थिरता प्राप्त करणे.
– त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे.

Ajit Pawar : ‘भाजपनं नाकारलं म्हणून अनिल देशमुखांनी साथ सोडली’; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

योजनेचे लाभार्थी कोण?
– गावोगावी जाऊन भटकंती करून उपजीविका करणारे लोक
– विमुक्त आणि भटक्या जाती जमातीचे लोक

योजनेसाठी अटी काय?
अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असावी.
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीचं घर नसावं.
अर्जदार कच्च्या घरात झोपड्यांमध्ये राहणारा असावा.
लाभार्थी कुटुंबानं यापूर्वी कोणत्याही राज्यातील कोणत्याही घरकूल
या योजनेचा लाभ पात्र कुटुंबात एकाच व्यक्तिला मिळेल.
योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
लाभार्थी कुटूंब भूमिहीन असावे.
लाभार्थी सहा महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ही फक्त ग्रामीण भागासाठी लागू आहे.
10 पात्र लाभार्थी कुटुंबासाठी या योजनेअंतर्गत जागा मिळत असल्यास लाभ दिला जाईल.
20 कुटुंबासाठी 1 हेक्टर जमीन उपलब्ध नसल्यास अटी शिथिल करण्याचे अधिकार तालुका स्तरावरील समितीला आहेत.
वैयक्तिक लाभ घ्यायचा असेल, तर रमाई आवास घरकूल योजनेंतर्गत वैयक्तिक लाभ मिळेल.

कोणाला प्राधान्य मिळणार?
– गावोगावी भटकंती करुन उपजीविका करणारे लोक
– अपंग
– महिला
– पूरग्रस्त क्षेत्र
– दारिद्र्य रेषेखालील कुटूंब
– विधवा
– परितक्ता यांना प्राधान्याने लाभ दिला जाईल

लाभाचे स्वरुप काय?
– या योजनेंतर्गत निवड झालेल्या विमुक्त आणि भटक्या जमातीच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच गुंठे जमीन देऊन त्यांना 269 चौरस फूटाचे घर बांधून दिले जाते.
– उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबाला शासकीय योजनेद्वारे स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाते.
– भूखंड कोणालाही हस्तांतरीत करता येणार नाही किंवा विकता येत नाही किंवा भाडेतत्वावर देता येणार नाही.
– दरवर्षी 34 जिल्ह्यातील (मुंबई व बृहन्मुंबई वगळून) प्रत्येकी तीन गावं निवडून त्या गावातील कुटुंबांना या योजनेचा फायदा दिला जातो.
– झोपडीत राहणारे दारिद्र रेषेखालील कुटूंब ज्यांच्या घरात कमावणारा व्यक्ती नाही, अशा विधवा दिव्यांग, महिला आणि पूरग्रस्त कुटुंबांना या योजनेंतर्गत प्राधान्याने निवड करुन फायदा दिला जातो.

अर्ज कुठे करावा?
या योजनेंतर्गत अर्जदारांनी आपल्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाची भेट घ्यावी. आवश्यक कागदपत्रांची आणि या योजने संबंधित अधिक माहितीची चौकशी करावी आणि समाजकल्याण कार्यालयामध्ये अर्ज दाखल करावेत.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube