Mastercard, Visa की RuPay तुमच्यासाठी कोणते कार्ड बेस्ट? एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही

Credit Card Benefits : देशातील बाजारात गेल्या काही वर्षांपासून क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या कार्ड्चा वापर

Credit Card Benefits

Credit Card Benefits : देशातील बाजारात गेल्या काही वर्षांपासून क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या कार्ड्चा वापर करत आज ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहे. क्रेडिट कार्ड तुम्हाला पैसे उधार घेण्यासाठी मदत करते तर डेबिट कार्ड तुमच्या खर्चाला मर्यादेतच नियंत्रित ठेवते. भारतीय बाजारात Visa, Mastercard, RuPay आणि Maestro कार्ड्सची मागणी झपाट्याने वाढली आहे. तिन्ही कंपनींचे कार्ड विविध पेमेंट नेटवर्क्सवर कार्यरत आहेत देशांतर्गत व्यवहारांसाठी RuPay हा एक किफायतशीर पर्याय आहे, तर Visa आणि Mastercard यांना जागतिक स्तरावर स्वीकारले जाते. योग्य कार्ड निवडण्यासाठी, त्यावरील शुल्क (Fees), व्यवहाराच्या मर्यादा आणि उपलब्ध ऑफर्स यांची तुलना करणे अत्यंत आवश्यक आहे.

Visa कार्ड्सचे फायदे

Visa हे भारतातील सर्वात लोकप्रिय पेमेंट नेटवर्क आहे, जे देशांतर्गत तसेच परदेशातील ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यवहारांना सुलभ करते. Classic, Gold, Platinum, Signature आणि Infinite यांसारखे कार्डांचे विविध व्हेरियंट (Variants) उपलब्ध आहेत. ही कार्ड्स मजबूत सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज असतात आणि 24/7 ग्राहक सेवा (Customer Support) देतात. शिवाय, जगभरातील २०० हून अधिक देशांमध्ये ही कार्ड्स स्वीकारली जातात.

Master कार्ड्सचे फायदे

Visa नंतर, Mastercard हे दुसरे सर्वात जास्त वापरले जाणारे आंतरराष्ट्रीय पेमेंट नेटवर्क आहे. याचे विविध कार्ड प्रकार ज्यामध्ये Standard, Platinum आणि World Debit यांचा समावेश होतो. अनेकदा ‘कॅशबॅक’ आणि ‘रिवॉर्ड पॉइंट्स’ यांसारखे फायदे देतात. जागतिक स्तरावरील खरेदी आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी हा एक विश्वासार्ह पर्याय ठरतो.

RuPay कार्ड्सचे फायदे

RuPay हे NPCI (National Payments Corporation of India) द्वारे विकसित केलेले एक स्वदेशी पेमेंट नेटवर्क आहे आणि ते सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील बँकांद्वारे जारी केले जाते. याचे मुख्य फायदे म्हणजे देशांतर्गत व्यवहारांसाठी कमी व्यवहार शुल्क आणि व्यवहारांची जलद प्रक्रिया गती. ATM मधून पैसे काढण्यासाठी आणि ऑनलाइन खरेदीसाठी हे कार्ड विशेषतः उपयुक्त ठरते.

Maestro कार्ड्सचे फायदे

Maestro हे 1991 पासून Mastercard नेटवर्कचा एक भाग आहे आणि ATM मधून पैसे काढण्यासाठी तसेच ऑनलाइन व्यवहारांसाठी जगभरात स्वीकारले जाते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय असे दोन्ही प्रकारचे व्यवहार करण्यासाठी ही कार्ड्स सुरक्षित मानली जातात. जगभरातील २१० हून अधिक देशांमध्ये ही कार्ड्स स्वीकारली जातात.

योग्य कार्ड कसे निवडावे?
सुरुवात करताना कार्डचे वार्षिक शुल्क, इतर आकारले जाणारे शुल्क आणि पैसे काढण्याची किंवा व्यवहारांची मर्यादा तपासून पहा. आंतरराष्ट्रीय खरेदीसाठी, जागतिक स्तरावर कार्यरत असलेले कार्ड निवडणे अधिक फायदेशीर ठरते तर देशांतर्गत वापरासाठी ‘RuPay’ हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तसेच, कॅशबॅक ऑफर्स, रिवॉर्ड्स किंवा प्रवासाशी संबंधित लाभांवरही (Travel Benefits) लक्ष ठेवा.

आमच्या दोघांमधील संबंध अजूनही चांगले अन्…, घटस्फोटावर गायक राहुल देशपांडेची पहिली प्रतिक्रिया

तुमच्यासाठी कोणते कार्ड योग्य आहे?
देशांतर्गत वापरासाठी आणि कमी शुल्काचा विचार करता ‘RuPay’ हा एक उत्कृष्ट पर्याय आहे, तर ‘Visa’ आणि ‘Mastercard’ तुम्हाला जागतिक स्तरावरील व्यवहार करण्याची सुविधा देतात.

follow us