आमच्या दोघांमधील संबंध अजूनही चांगले अन्…, घटस्फोटावर गायक राहुल देशपांडेची पहिली प्रतिक्रिया

Rahul Deshpande : गायन आणि अभिनेता राहुल देशपांडे नेहमी काहींना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत राहतात. कधी आपल्या चित्रपटामुळे

Rahul Deshpande

Rahul Deshpande : गायन आणि अभिनेता राहुल देशपांडे नेहमी काहींना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत राहतात. कधी आपल्या चित्रपटामुळे तर कधी वैयक्तिक कारणांमुळे राहुल सोशल मीडियावर चर्चेत राहतात. शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे नातू यांचे नातू राहुल देशपाडे यांनी आपल्या कलेतून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांनी नुकतंच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करत मोठा खुलासा केला आहे. राहुल यांनी या मुलाखतीमध्ये पत्नीसोबत घटस्फोट घेण्यामागचं कारण काय? यावर देखील भाष्य केले. पत्नीसोबत घटस्फोट घेतल्याने राहुल देशपांडे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांनी घटस्फोट का घेतला? असे अनेक प्रश्न चाहते सोशल मीडियावर विचारत आहे.  तर आता या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केले आहे. तसेच सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगवरही प्रतिक्रिया दिली आहे.

या मुलाखतीमध्ये राहुल देशपांडे म्हणाले की, एक कलाकार म्हणून मी प्रामाणिक व्यक्ती आहे. रेणूका, मी आणि माझ्या लेकीचे एकत्रित अनेक फोटो तुम्हाला दिसतील. मला असं वाटलं की ही माझी एक जबाबदारी आहे. जे मला फॉलो करतात, समाजात जे माझे चाहते आहे. हा अध्याय आता संपला आहे. एवढंच या पोस्टमागचा हेतू होता, एवढंच सांगणं होतं असं या मुलाखतीमध्ये राहुल देशपांडे म्हणाले.

निवडणूक आयोगाची ‘या’ राज्यात मोठी कारवाई, अनेक IPS अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश-

पुढे बोलताना राहुल देशपांडे म्हणाले की, आमच्या दोघांमधील संबंध अजूनही चांगले आहेत. आम्ही दोघे रेणूकाचे आई- वडील आहोत आणि कायम राहू असेही या मुलाखतीमध्ये राहुल देशपांडे म्हणाले.

follow us