निवडणूक आयोगाची ‘या’ राज्यात मोठी कारवाई, अनेक IPS अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश

West Bengal Assembly Elections : पश्चिम बंगाल विधानसभा 2026 निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बंपर मतदान झाला असून आता दुसऱ्या टप्प्यातील

West Bengal Assembly Elections

West Bengal Assembly Elections : पश्चिम बंगाल विधानसभा 2026 निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बंपर मतदान झाला असून आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेची तयारी सुरु झाली आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत निवडणूक आयोगाने राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहे.

निवडणूक आयोगाने (Election Commission) डायमंड हार्बर पोलीस जिल्ह्यामध्ये निवडणुकीतील निष्पक्षता राखण्याबाबत कर्तव्यात गंभीर कसूर केल्याच्या आरोपांचा हवाला देत, निवडणूक आयोगाने पाच पोलीस अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन करण्याची आणि त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याची शिफारस केली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार, संदीप गराई (अतिरिक्त पोलीस अधीक्षक, डायमंड हार्बर), सजल मंडल (एसडीपीओ), मौसम चक्रवर्ती (निरीक्षक-प्रभारी, डायमंड हार्बर पोलीस ठाणे), अजय बाग (निरीक्षक-प्रभारी, फलता पोलीस ठाणे) आणि शुभेच्छा बाग (अधिकारी-प्रभारी, उस्थी पोलीस ठाणे) यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

निवडणूक आयोगाने आदेशात आयोगाने नमूद केले आहे की, या अधिकाऱ्यांनी निवडणुकीदरम्यान निष्पक्षता राखण्याबाबत घोर निष्काळजीपणा दाखवला. शिवाय, डायमंड हार्बरच्या पोलीस अधीक्षक डॉ. इशानी पाल यांना ताकीद (चेतावणी) देण्याचे निर्देशही जारी करण्यात आले आहेत. आयोगाने असे निरीक्षण नोंदवले की, त्या आपल्या अधिनस्थ अधिकाऱ्यांमध्ये शिस्त आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्यात अपयशी ठरल्या.

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल (West Bengal Assembly Elections) सरकारला हे सर्व आदेश तातडीने अंमलात आणण्याचे आणि 25 एप्रिल रोजी सकाळी 11:00 वाजेपर्यंत आयोगाकडे याच्या अंमलबजावणीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाचे सचिव सुजित कुमार मिश्रा यांनी जारी केलेल्या पत्राद्वारे हे निर्देश कळवण्यात आले.

तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने हिंगलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतही महत्त्वपूर्ण कारवाई केली असून, तेथील अधिकारी-प्रभारी (Officer-in-Charge) संदीप सरकार यांचे तातडीने निलंबन करण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कथित पक्षपात, स्थानिक घटकांशी संगनमत आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात आलेले अपयश यांसह त्यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याचे आयोगाने मानले आहे.

दिल्लीनंतर पंजाबमध्येही ‘आप’ ला धक्का; 28 आमदार सोडणार पक्षाची साथ?

मुख्य सचिवांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात, आयोगाने नमूद केले आहे की संदीप सरकार यांच्याविरुद्ध तातडीने विभागीय चौकशी सुरू केली जावी. याव्यतिरिक्त, हिंगलगंज पोलीस ठाण्यासाठी नवीन अधिकारी-प्रभारीच्या नियुक्तीचा प्रस्ताव लवकरात लवकर आयोगाकडे सादर करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

follow us