National Maritime Day : ‘या’ खास कारणामुळे साजरा केला जाातो ‘राष्ट्रीय सागरी दिवस’
मुंबई : भारतात सागरी मार्गाच्या प्रवासाला मोठा इतिहास आहे. पुरातन कालापासून दक्षिण भारतातील पूर्व अशिया आणि पश्चिमेतील अरब राष्ट्रांसह भातातून सागरी मार्गाने संबंध प्रस्थापित केले जात होते. आजही भारताचा 90 टक्के व्यापार समुद्री मार्गाने होतो. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बंदर आणि जहाजांचा मोठा वाटा आहे.
भारतात परकिय सत्तांची आक्रमण देखील यात सागरी मार्गांनी झाली. त्याच दरम्यान पहिली पूर्णपणे संघटित अशी भारतीय व्यापारी कंपनीचं पहिलं जहाज 5 एप्रिल 1919 ला मुंबईहून लंडनला व्यापाराच्या हेतूने रवाना झालं होतं या जहाजाचं नाव ‘सिंदिया शिपिंग’ असं होतं. या जहाजाच्या रवानगीला ब्रिटिशांनी प्रचंड विरोध केला मात्र या विरोधाला झुगारत हे भारतीय कंपनीच जहाज मार्गस्थ झालं. त्या दिवसाचं औचित्त साधत 5 एप्रिल हा दिवस ‘राष्ट्रीय सागरी दिवस’ म्हणून सादरा केला जातो.
यावर्षी 60 वा ‘राष्ट्रीय सागरी दिवस’ साजरा केला जात आहे.’राष्ट्रीय सागरी दिवस’ बंदर, जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाद्वारे साजरा केला जातो. ‘राष्ट्रीय सागरी दिवस’ नाविकांची सेवा आणि राष्ट्रीय समुद्री उद्योगांचं संवर्धन आणि विकासाशी संबंधित लोक आणि संस्थांच्या सेवांना पुरस्कार, शिष्यवृत्ती आणि सुविधांना मान्यता दिली जाते. यावर्षीच्या ‘राष्ट्रीय सागरी दिवस’ चा विषय : ‘कोरोनाच्या पलिकडे नौकानयन’ हा विषय भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत अंतर्गत आहे.
भारतकडे 12 प्रमुख बंदर आणि 200 हून अधिक उप-प्रमुख बंदर (लघु बंदर) आहेत. या बंदरांवर संचालित एकुण कार्गोंमध्य 54% कार्गो 12 प्रमुख बंदरांद्वारे नियंत्रित केले जातात. इतर “पोर्ट लिमिट्स” आहेत. त्यावर कार्गो माहीत त्यांचा वापर मासेमारीसाठी केला जातो. तसेच प्रवाशांची ने-आण करण्यासाठी केला जातो.
तुम्हाला माहिती आहे का? गौतमीला कोणता खेळाडू आवडतो? पहा ती काय म्हणाली…
भारतातील मुख्य बंदर :
श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट, (कोलकाता), पश्चिम बंगाल
पारादीप पोर्ट, ओडिसा
विशाखापट्नम पोर्ट, आंध्रप्रदेश
कामराजार पोर्ट (एन्नोर), तमिळनाडु
चेन्नई पोर्ट, तमिळनाडु
वी.ओ,चिदम्बरनार पोर्ट (टूटीकोरिन), तमिळनाडु
दीनदयाल पोर्ट (कांडला), गुजरात
मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र
मोरमुगाओ पोर्ट, गोवा
न्यू मेंगलुरु पोर्ट, कर्नाटक
कोची पोर्ट, केरळ