आता ट्विटर यूजर्सही होणार मालामाल, नवीन फीचर लॉन्च

आता ट्विटर यूजर्सही होणार मालामाल, नवीन फीचर लॉन्च

Twitter Ads Revenue Sharing : इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून अनेक बदल केले आहेत. आता मस्कने ट्विटरचे नाव बदलून एक्स केले आहे. त्याच वेळी कंपनीने ट्विटर हँडल बदलून ‘@X’ केले आहे. आता ट्विटरवरील जाहिरातमधून पैसे कमविण्याचे फीचर भारतासह जगभरात लॉन्च केले आहे. या फीचरद्वारे प्लॅटफॉर्मचे व्हेरिफाईड कॉन्टेन्ट क्रिएटर्स पैसे कमवू शकणार आहेत.

कंपनीने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले की क्रिएटर्संना पैसै कमवण्यासाठी X (X.com) हे इंटरनेटवरील सर्वोत्तम ठिकाण असावे अशी आमची इच्छा आहे. या दिशेने आमचे पहिले पाऊल आहे. कंपनीच्या या पोस्टला उत्तर देताना इलॉन मस्कने लिहिले, ‘काहीही तयार करा!’

अलीकडेच कंपनीने जाहिरात रेव्हेन्यू शेअरिंग प्रोग्राम लॉन्च करण्याची घोषणा केली होती. यूजर्स सेटिंग्जमधील मॉनेटायझेशन टॅबवर जाऊन रेव्हेन्यू शेयरिंग प्रोग्रामसाठी अप्लाय करू शकतात.

‘राहुल गांधींसाठी योग्य मुलगी शोधा’, सोनिया गांधींनी दिली जबाबदारी

यूजरचे वय 18 वर्षापेक्षा अधिक असणं गरजेचं आहे. यूजरचा ईमेल आयडीही व्हेरिफाईड हवा आणि 2FA देखील ऑन असणं गरजेचं आहे. यूजरने भूतकाळात ट्विटर यूजर अॅग्रीमेंटचे उल्लंघन केलेलं नसावं, अशा अटींची पूर्तता केल्यानंतरच तुम्हाला अॅड्स रेव्हेन्यू शेअरिंग सुविधा मिळणार आहे.

Chandrakant Patil : आगामी लोकसभेत मोदीच पंतप्रधान, मोदींशिवाय समोर दुसरं आहे तरी कोण?

* Twitter वरून पैसे कमवण्याची संधी

* ब्लू किंवा व्हेरिफाईड ऑर्गनायझेशनचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.
* तुमच्या पोस्टला गेल्या 3 महिन्यांत 15 दशलक्ष इंप्रेशन मिळाले पाहिजेत.
* किमान 500 फॉलोअर्स असावेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube